महानगर टेलिफोन प्रचंड तोट्यात सात बँकांचे ८५८५ कोटी थकले

mtnl


नवी दिल्ली- केंद्र सरकारच्या मालकीच्या एमटीएनएल लिमिटेड या दूरसंचार कंपनीचा तोटा आता ३४ हजार कोटी रुपयांवर पोहोचला आहे. कंपनीची सात बँकांची एकूण थकबाकी ८ हजार ५८५ कोटी रुपयांवर पोहोचली आहे. या बरोबरच कंपनीला सरकारने दिलेल्या सार्वभौम हमीची रक्कम २४ हजार ७१ कोटी रुपये आहे तर या हमीसाठी देण्यात येणाऱ्या व्याजाची रक्कम १,८२८ कोटी रुपये आहे. त्यामुळे एमटीएनलाचा तोटा वाढला आहे. एमटीएनची युनियन बँकेतील थकबाकी ३,७३३.२२ कोटी, इंडियन ओव्हरसिज बँकेतील २,४३४.१३ कोटी, बँक ऑफ इंडिया १,१२१.०९ कोटी, पंजाब नॅशनल बँक ४७४.६६, स्टेट बँक ऑफ इंडिया ३६३.४३, युको बँक २७२.५८,पंजाब व सिंध बँक १८४.८२ कोटी रुपये इतकी झाली आहे. ही थकबाकी गेल्यावर्षीच्या फेब्रुवारी ते या वर्षीच्या ३१ मार्च पर्यंतची आहे. या महाकाय तोट्यातून एमटीएनल कशा प्रकारे बाहेर येईल हे आता पाहावे लागणार आहे.