Operation Sindoor NCERT: भारताने पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादाला कसे प्रत्युत्तर दिले, हे आता शालेय विद्यार्थ्यांना (Operation Sindoor NCER) शिकवले जाणार आहे. नॅशनल कौन्सिल ऑफ एज्युकेशनल रिसर्च अँड ट्रेनिंग (NCERT) ने ‘ऑपरेशन सिंदूर’ (Operation Sindoor) या लष्करी कारवाईवर आधारित एक विशेष मॉड्यूल तयार केले आहे.
इयत्ता तिसरी ते बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना देशाची संरक्षण तयारी, नवीन तंत्रज्ञानाचा वापर आणि राष्ट्रीय सुरक्षेबद्दल माहिती देण्याचा यामागचा उद्देश आहे.
हे मॉड्यूल विद्यार्थ्यांना दहशतवादी धोक्यांना देश कसा प्रतिसाद देतो आणि संरक्षण, मुत्सद्देगिरी तसेच विविध मंत्रालयांमध्ये समन्वय कसा साधला जातो, हे समजून घेण्यास मदत करेल. त्यामुळे आता भारतीय लष्कराची शौर्यगाथा विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमाच्या माध्यमातून समजूत घेता येणार आहे.
NCERT launches modules on Operation Sindoor, hails mission of courage
— ANI Digital (@ani_digital) August 20, 2025
Read @ANI Story | https://t.co/vM8yesqQF0#NCERT #module #OperationSindoor #OPSindoor pic.twitter.com/12mdcg35iI
काय आहे ‘ऑपरेशन सिंदूर’? (Operation Sindoor NCERT)
एप्रिलमध्ये पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याला (Pahalgam Terrorist attack) भारताने दिलेले एक जोरदार प्रत्युत्तर म्हणून ‘ऑपरेशन सिंदूर’ सुरू करण्यात आले.
दहशतवादी हल्ल्याला प्रत्युत्तर देण्यासाठी भारताने ‘ऑपरेशन सिंदूर’ ही रणनीतिक लष्करी मोहीम सुरू केली. ही एक अचूक कारवाई होती, ज्यामध्ये भारतीय सशस्त्र दलांनी पाकिस्तान आणि पाकव्याप्त जम्मू-काश्मीरमधील दहशतवादी तळ आणि प्रशिक्षण केंद्रांना लक्ष्य केले. या मोहिमेत लष्कर आणि हवाई दलाने एकत्र काम केले. या कारवाई अंतर्गत पाकस्थित अनेक दहशतवाद्यांना ठार करण्यात आले.
स्थानिक लोकांची भूमिका आणि पाकिस्तानचा हल्ला
पहलगाम हल्ल्यानंतर स्थानिक लोकांनी दहशतवादाविरोधात घेतलेली भूमिका या मॉड्यूलमध्ये विशेषत्वाने नमूद करण्यात आली आहे. “त्यांचा प्रतिसाद लोकांच्या शांतताप्रिय स्वभावाचे खरे दर्शन घडवतो,” असे यात म्हटले आहे.
भारताने दिलेल्या प्रत्युत्तरानंतर, 8 मे रोजी पाकिस्तानने भारताच्या हवाई तळांवर, लॉजिस्टिक केंद्रांवर आणि सीमेवरील सैन्याच्या मुख्यालयांवर ड्रोन वापरून हल्ला करत परिस्थिती आणखी वाढवली. मात्र, भारताच्या एकीकृत हवाई संरक्षण प्रणालीने हा हल्ला यशस्वीपणे रोखला.
या मॉड्यूलमध्ये संरक्षण दलांचे प्रमुख आणि लष्कर, नौदल, हवाई दल यांच्या प्रमुखांच्या जवळच्या समन्वयामुळेच हे हल्ले यशस्वी झाले, असे नमूद केले आहे. दोन्ही स्तरावरील मॉड्यूलमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींनी या निर्णायक प्रतिसादाबद्दल भारतीय सशस्त्र दलांची प्रशंसा केल्याचा उल्लेख आहे.
हे देखील वाचा –
महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता? हवामान विभागाचा अलर्ट जारी
अतिवृष्टीमुळे मुंबई दुसऱ्या दिवशीही थबकली! आजही मुसळधार पावसाची टांगती तलवार