NCERT Sanskrit Textbook: आता संस्कृत शिकणे होणार आणखी सोपं अन् मजेशीर, NCERT ने आणले ‘हे’ खास पुस्तक

NCERT New Textbook 2025 | एनसीईआरटीने इयत्ता 8 वीसाठी नवीन संस्कृत पुस्तक (NCERT New Textbook 2025) आणले आहे. नवीन राष्ट्रीय शिक्षण धोरणानुसार (NEP 2020) आणि शालेय शिक्षणासाठी राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखड्यावर (NCF-SE 2023) आधारित इयत्ता 8 वीसाठी ‘दीपकम्’ हे नव्याने सादर केलेले संस्कृत पाठ्यपुस्तक (NCERT Sanskrit Textbook) आता विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध झाले आहे.

राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेने (NCERT) हे पुस्तक नुकतेच लाँच केले असून, यामध्ये संस्कृत शिकण्याची प्रक्रिया अधिक मजेशीर, सोपी आणि सर्जनशील बनवण्यासाठी अनेक नावीन्यपूर्ण वैशिष्ट्यांचा समावेश करण्यात आला आहे.

या नवीन पाठ्यपुस्तकात प्रकल्प-आधारित शिक्षणाची मांडणी करण्यात आली आहे, ज्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये तार्किक विचारसरणी आणि सर्जनशीलता विकसित होईल. पुस्तकात चित्रांवर आधारित धडे आणि व्यावहारिक व्याकरणाचे सराव आहेत, जे निदान आणि सुधारणा या प्रक्रियांना चालना देतील.

‘डिजिटल इंडिया’सारख्या आधुनिक विषयांवर आधारित धडे विद्यार्थ्यांना संस्कृत भाषेचा कालानुरूप वापर शिकवतील. शिवाय, पुस्तकात रंगीत लेखन सरावांसह विविध मजेशीर क्रियाकलाप आहेत जे मुलांना सक्रिय ठेवतील. ‘हितोपदेश’ आणि ‘चरक संहिता’ यांसारख्या प्राचीन ग्रंथांमधून मानवी मूल्यांची साद घालणाऱ्या कविता व मजकुरांनी हे पुस्तक अधिक समृद्ध झाले आहे.

एनसीईआरटीने त्यांच्या X.com (माजी ट्विटर) हँडलवरून ही माहिती जाहीर केली आहे. गेल्या काही दिवसांत NEP 2020 व NCF-SE 2023 नुसार इयत्ता 5 वी व 8 वीसाठी अनेक नवीन पाठ्यपुस्तके लाँच करण्यात आली आहेत. विद्यार्थ्यांना ही पुस्तके NCERT च्या अधिकृत वेबसाइटवर आणि Amazon.in वर खरेदीसाठी उपलब्ध आहेत.

शालेय अभ्यासक्रमात या नव्या दृष्टीकोनामुळे विद्यार्थ्यांना संस्कृतसारख्या प्राचीन भाषेची गोडी लागेलच, शिवाय ते आधुनिक विषयांशी सुसंगत अभ्यासही करू शकतील, अशी अपेक्षा शिक्षण क्षेत्रातून व्यक्त होत आहे.

हे देखील वाचा –

Nishikant Dubey: ‘पंतप्रधान मोदींशिवाय भाजपला 150 जागाही मिळणार नाहीत’, ‘या’ खासदाराने केले मोठे विधान

मेटाकडून भाषांतरात मोठी चूक, थेट मुख्यमंत्र्यांनाच मृत घोषित केले; आता मागितली माफी

Air India Plane Crash: टाटा समूहाकडून एअर इंडिया AI-171 अपघातग्रस्तांसाठी ट्रस्ट स्थापन, 500 कोटींची करणार मदत