NEET UG Exam 2025 | उद्या देशभरात NEET UG परीक्षा! ड्रेस कोड आणि नियम ठेवा लक्षात

NEET UG Exam 2025

NEET UG Exam 2025 | देशभरातील वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये MBBS अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी आवश्यक असलेली राष्ट्रीय पात्रता सह प्रवेश परीक्षा (NEET UG 2025) रविवारी (4 मे) होणार आहे. ही परीक्षा रोजी दुपारी 2 ते सायंकाळी 5 या वेळेत घेण्यात येत आहे.

देशभरात हजारो परीक्षा केंद्रांवर ही परीक्षा होणार असून, विद्यार्थ्यांची सुरक्षा आणि प्रक्रियेची पारदर्शकता यासाठी केंद्रांवर कडक उपाययोजना केल्या आहेत. परीक्षेच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शक सुचना जारी करण्यात आले आहे.

विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी (NEET exam 2025) खालीलपैकी कोणतेही एक मूळ ओळखपत्र जसे की, आधार कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, पॅन कार्ड, मतदार ओळखपत्र किंवा 12वीच्या प्रवेशपत्राची मूळ प्रत.सोबत बाळगणे आवश्यक आहे.

NEET UG च्या आधारे या कोर्सेसमध्ये प्रवेश

NEET UG परीक्षेच्या माध्यमातून देशातील वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये MBBS, BDS, BAMS, BHMS, BUMS यांसह विविध पदवीपूर्व वैद्यकीय अभ्यासक्रमांसाठी प्रवेश मिळतो. याशिवाय, Military Nursing Service (MNS) साठीही उमेदवारांना NEET UG च्या गुणांच्या आधारे आर्म्ड फोर्सेस मेडिकल सर्व्हिस हॉस्पिटलच्या बीएससी नर्सिंग अभ्यासक्रमात प्रवेश घेऊ शकतील.

ड्रेस कोड: परीक्षा केंद्रात प्रवेशासाठी आवश्यक नियम

  • अर्ध्या बाह्यांचे शर्ट किंवा टी-शर्ट आणि ट्राउजर/पँट परिधान करण्यास परवानगी आहे.
  • लांब बाह्यांच्या कपड्यांना परवानगी नाही.
  • महिलांनी अर्ध्या बाह्यांची कुर्ती किंवा टॉप परिधान करावा.
  • मेटलचे बटण असलेले कपडे, जीन्स, बूट, कोणतेही दागिने (jewellery) घालून येण्यास बंदी आहे. कोणतीही धातूची वस्तू सोबत आणू नये.
  • विद्यार्थ्यांनी फक्त चप्पल किंवा सँडल परिधान कराव्या. बूट घालण्याची परवानगी नाही.

परीक्षा केंद्रात नेण्यास परवानगी असलेली वस्तू

  • मूळ ओळखपत्र (Original ID Proof) – आधार, पॅन, वोटर कार्ड इ.
  • NEET Admit Card (ज्यावर पासपोर्ट साइज फोटो लागलेला असावा)
  • अटेंडन्स शीटवर चिकटवण्यासाठी एक पासपोर्ट साइज फोटो (पांढऱ्या पार्श्वभूमीसह)
  • एडमिट कार्डसोबत डाउनलोड केलेल्या Performa वर लावण्यासाठी फोटो
  • एक पारदर्शक पाण्याची बाटली
  • नीट एडमिट कार्ड सोबत सेल्फ डिक्लरेशन फॉर्म (Self Declaration Form) आणि अंडरटेकिंग फॉर्म (Undertaking Form) देखील आणावा लागेल.

इतर महत्त्वाचे नियम

  • दुपारी 1:30 नंतर परीक्षा केंद्रात प्रवेश दिला जाणार नाही.
  • परीक्षा दुपारी 2 वाजता सुरू होईल.
  • कोणत्याही प्रकारची इलेक्ट्रॉनिक उपकरणे (electronic devices), खाण्याचे पदार्थ, घड्याळ, टोपी, गॉगल्स, दागिने परीक्षा केंद्रात नेण्यास सक्त मनाई.
  • कच्चे काम (Rough work) उत्तरपत्रिकेतच करावे लागेल.
  • OMR sheet भरताना काळजी घ्यावी.