Nepal Gen z Protests : गेल्याकाही दिवसांपासून नेपाळ तरूणांच्या आंदोलनामुळे धगधगत आहे. तीव्र जनआंदोलनामुळे पंतप्रधान केपी शर्मा ओली यांना राजीनामा द्यावा लागला आहे. नेपाळमधील Gen Z तरुणांनी सोशल मीडियावर सुरू केलेल्या एका मोहिमेमुळे हा उद्रेक झाला.
राजकारण्यांची मुले म्हणजेच ‘नेपो किड्स’ यांचा श्रीमंती थाट आणि अलिशान जीवनशैली, तसेच देशातील वाढती बेरोजगारी, भ्रष्टाचार आणि गरिबी यामुळे जनतेच्या मनात असलेला संताप सोशल मीडियावर उफाळून आला आणि त्याचे रूपांतर देशव्यापी आंदोलनात झाल्याचे पाहायला मिळाले.
Nepal Gen z Protests : कोण आहेत नेपाळचे ‘नेपो किड्स’ ?
स्मिता दहल
कम्युनिस्ट पार्टीचे नेते आणि माजी पंतप्रधान पुष्प कमल दहल ‘प्रचंड’ यांची नात स्मिता दहल ही सुद्धा लोकांच्या टीकेचे लक्ष्य बनली. तिने सोशल मीडियावर लाखो रुपयांच्या किमतीचे हँडबॅग्ज दाखवल्यानंतर नेपाळी जनतेने तिचा निषेध केला.
श्रृंखला खातीवाडा
माजी आरोग्यमंत्री ब्रोध खातीवाडा यांची मुलगी श्रृंखला खातीवाडा ही माजी मिस नेपाळ आहे. तिच्या परदेश दौऱ्याचे आणि शाही जीवनशैलीचे फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले. आंदोलकांचा रोष तिच्यावर इतका वाढला की, त्यांनी तिच्या कुटुंबाचे घर पेटवून दिले.
शिवाना श्रेष्ठ
माजी पंतप्रधान शेर बहादूर देऊबा यांची सून आणि लोकप्रिय गायिका शिवाना श्रेष्ठ हिच्या व्हिडीओंवरही नेपाळी तरुणांनी टीका केली. या व्हिडीओमध्ये ती कोट्यवधी रुपयांची घरे आणि महागडे फॅशन ब्रँड दाखवताना दिसत होती. तिच्या अशा व्हिडीओंमुळे जनतेचा संताप आणखी वाढला.
सौगात थापा
कायदा मंत्री बिंदू कुमार थापा यांचा मुलगा सौगात थापा याचेही आलिशान जीवनशैली दर्शवणारे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. त्याच्या फोटोंमुळे नेपाळमध्ये राजकीय कुटुंबांबद्दलचा राग आणखी वाढला. याशिवाय, इतर नेत्यांची मुले आलिशान लाइफ जगत असताना सर्वसामान्यांना त्रास होत असल्याने नेपाळमधील आंदोलन अधिकच पेटले.
नेपाळमध्ये सामान्य जनता महागाई आणि गरिबीने त्रस्त असताना नेत्यांच्या मुलांचे महागड्या वस्तू, आलिशान गाड्या आणि परदेशवारीचे व्हिडीओ आणि फोटो TikTok, Instagram, आणि X सारख्या प्लॅटफॉर्मवर व्हायरल झाले. ‘नेपो किड्स’च्या संपत्तीची हे फोटो पाहून लाखो नेपाळी तरुणांनी तीव्र संताप व्यक्त केला. याच संतापातून आंदोलकांनी अनेक राजकीय नेत्यांची घरे आणि शासकीय इमारती पेटवून दिल्या.
दरम्यान, 31 लोकांचा मृत्यू आणि 1000 हून अधिक लोक जखमी झाल्यानंतर पंतप्रधान केपी शर्मा ओली यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. राष्ट्राध्यक्ष रामचंद्र पौडेल यांनी शांततेचे आवाहन केले आहे, तर काठमांडूमध्ये लष्कराने संचारबंदी लागू केली आहे.
हे देखील वाचा –
Women’s World Cup 2025: महिला विश्वचषकात नवा इतिहास; ICC ने घेतला ‘हा’ खास निर्णय
चार्ली कर्क हत्या: एफबीआयकडून शूटरचा फोटो जारी; संशयिताचा शोध सुरू