मुंबई – मालेगाव बॉम्बस्फोट (Malegaon bomb blast)प्रकरणी निर्दोष सुटका झालेले माजी कर्नल पुरोहित यांची विशेष तपास पथकाच्या कोठडीत छळ झाल्याची याचिका फेटाळण्यात आली आहे. विशेष तपास पथकाचे (Special Investigation Team)न्यायाधीश ए.के. लाहोटी (Judge A.K. Lahoti,) यांनी ही याचिका फेटाळली आहे.
न्यायालयाने म्हटले आहे की, ही याचिका तब्बल १६ वर्षांनंतर करण्यात आली. त्याचबरोबर कोठडीतील छळाचा (custodial abuse)याआधी कधीही उल्लेख झाला नाही. त्याबाबत एकही पुरावा सादर नाही . त्यामुळे या याचिकेचे प्रयोजन नाही. त्यामुळे ही फेटाळण्यात येत आहे. या संदर्भात सरकारी पक्षाने छळाचा दावा फेटाळून लावला.
त्यांनी न्यायालयाला सांगितले की, अशा प्रकारचा आरोप (claims) हा २००८ साली रिमांड न्यायालयासमोर करण्यात आला होता. त्यानंतरही त्यांच्या गुन्ह्याची तीव्रता लक्षात घेता पुरोहितना पोलीस कोठडीत पाठवण्यात आले. त्यानंतर ६ डिसेंबर २००८ रोजी पुरोहित यानेच मान्य केले की त्यांचा कोठडीत छळ झाला नाही. त्यांच्याच विनंतीवरुन त्यांची लष्करी रुग्णालयात तपासणी (medical examination)करण्यात आली असता. त्यांचा छळ झाल्याचे किंवा मारहाण झाल्याचे काहीही आढळले नाही. त्यावेळीही त्यांनी छळाचा विषय पुढे आणला नाही. त्यावर काही कायदेशीर मागणीही केली नाही. त्यामुळे कोणत्याही पुराव्यांच्या आधारे त्यांचा कोठडीत छळ झाल्याची याचिका (petition) मान्य करता येणार नाही.