Home / देश-विदेश / सरकारचा मोठा निर्णय; 20 वर्षांपेक्षा जुनी गाडी वापरता येणार; मात्र मोजावे लागतील जास्त पैसे

सरकारचा मोठा निर्णय; 20 वर्षांपेक्षा जुनी गाडी वापरता येणार; मात्र मोजावे लागतील जास्त पैसे

Old Vehicle Registration

Old Vehicle Registration: आता 20 वर्षांपेक्षाही जुनी गाडी तुम्हाला वापरता येणार आहे.केंद्र सरकारने 20 वर्षांपेक्षा जुन्या वाहनांच्या नोंदणीच्या नूतनीकरणासाठी नवा नियम लागू केला आहे, ज्यामुळे नोंदणी शुल्क (Old Vehicle Registration) मोठ्या प्रमाणात वाढले आहे. जुनी, प्रदूषण करणारी वाहने कमी करून नवीन आणि स्वच्छ वाहनांचा वापर वाढवणे हा यामागचा उद्देश आहे.

या नव्या नियमांनुसार, 20 वर्षांपेक्षा जुन्या वाहनांसाठी सुधारित शुल्क खालीलप्रमाणे आहे:

  • दुचाकी (मोटारसायकल): 2,000 रुपये
  • चारचाकी (कार): 10,000 रुपये
  • तीनचाकी आणि क्वाड्रिसायकल्स: 5,000 रुपये
  • आयात केलेल्या दुचाकी व तीनचाकी: 20,000 रुपये
  • आयात केलेल्या चारचाकी: 80,000 रुपये
  • इतर सर्व प्रकारच्या वाहनांसाठी हे शुल्क ₹12,000 निश्चित करण्यात आले आहे. या दरांमध्ये जीएसटीचा समावेश नाही.

दिल्ली-एनसीआरसाठी वेगळा नियम

हा नवा नियम संपूर्ण देशात लागू आहे, मात्र दिल्ली-एनसीआर (Delhi-NCR) प्रदेशाला त्यातून वगळण्यात आले आहे. दिल्लीतील प्रदूषणाची (pollution) गंभीर समस्या लक्षात घेता, तेथे जुन्या वाहनांवर कठोर नियम आधीपासूनच लागू आहेत.

दिल्लीमध्ये 15 वर्षांपेक्षा जुन्या पेट्रोल आणि 10 वर्षांपेक्षा जुन्या डिझेल वाहनांवर बंदी आहे. त्यामुळे, दिल्ली-एनसीआरमधील रहिवाशांना या वाढीव कालावधीचा फायदा होणार नाही.

सरकारने वाहनांचे कमाल वय 15 वरून 20 वर्षे केले आहे, पण मात्र आता नुतनीकरणासाठी अतिरिक्त पैसे खर्च करावे लागतील

व्यावसायिक वाहनांवरही परिणाम

हा बदल फक्त खासगी वाहनांपुरता मर्यादित नाही, तर व्यावसायिक वाहनांवरही याचा परिणाम होणार आहे. रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने 15 वर्षांपेक्षा जुन्या व्यावसायिक वाहनांसाठी शुल्क वाढवण्याचा प्रस्ताव दिला होता.

मात्र, अनेक संघटनांच्या विरोधामुळे, मध्यम आणि जड व्यावसायिक वाहनांसाठी 12,000 रुपयांचे एकसमान शुल्क लागू करण्यात आले आहे. याचबरोबर, सरकारने लवकरच वाहन फिटनेस चाचण्यांसाठीही नवीन शुल्क रचना जाहीर करण्याचे संकेत दिले आहेत.


हे देखील वाचा –

PAN Card हरवले? आता फक्त 5 मिनिटांत घरी बसून करा डाउनलोड, जाणून घ्या सोपी प्रक्रिया

भारताचे अंतराळ स्पेस स्टेशन कसे असेल? ISRO ने दाखवली पहिली झलक

‘आधार कार्ड’चा पुरावा ग्राह्य धरावा’, सर्वोच्च न्यायालयाचा आदेश; मतदार यादीतून वगळलेल्या मतदारांना मोठा दिलासा