Operation Sindoor India Strikes Pakistan | भारतीय सशस्त्र दलांनी (Indian Armed Forces) पाकिस्तान (Pakistan) आणि पाकव्याप्त काश्मीरमधील (PoK) दहशतवादी ठिकाण्यांवर हल्ला केला आहे. या मोहिमेला ‘ऑपरेशन सिंदूर’ (Operation Sindoor) असे नाव देण्यात आले आहे.
22 एप्रिल रोजी झालेल्या भीषण पहलगाम हल्ल्यात (Pahalgam Terror Attack) 25 भारतीय आणि एका नेपाळी नागरिकाचा बळी गेल्याच्या प्रत्युत्तरात ही कारवाई करण्यात आली.
या अचूक हल्ल्यांनंतर संरक्षण मंत्रालयाने (Ministry of Defence) एका निवेदनात म्हटले आहे की, भारताने एकूण 9 दहशतवादी ठिकाणे लक्ष्य केली आणि कोणत्याही पाकिस्तानी लष्करी तळांना (Pakistani Military Facilities) लक्ष्य केले नाही.
#PahalgamTerrorAttack
— ADG PI – INDIAN ARMY (@adgpi) May 6, 2025
Justice is Served.
Jai Hind! pic.twitter.com/Aruatj6OfA
संरक्षण मंत्रालयाने सांगितले, “एकूण नऊ ) ठिकाणे लक्ष्य करण्यात आली आहेत. आमची कारवाई केंद्रित, संतुलित होती, कोणत्याही पाकिस्तानी लष्करी तळांना लक्ष्य केले गेले नाही. लक्ष्य निवडण्यात आणि अंमलबजावणीच्या पद्धतीत भारताने संयम दाखवला आहे. पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर हे पाऊल उचलण्यात आले आहे. या हल्ल्यासाठी जबाबदार असलेल्यांना जबाबदार धरले जाईल या वचनाचे आम्ही पालन करत आहोत. ‘ऑपरेशन सिंदूर’ वर आज तपशीलवार माहिती दिली जाईल.” हल्ल्यानंतर भारतीय लष्कराने X (ट्विटर) वर “न्याय झाला. जय हिंद!” (Justice is Served. Jai Hind!) असे म्हटले आहे.
कुठल्या 9 ठिकाणांवर एअर स्ट्राईक (Air Strike)?
१) बहावलपूर (Bahawalpur)
२) मुरिदके (Muridke)
३) गुलपूर (Ghulpur)
४) भीमबर (Bhimbher)
५) चक अमरू (Chak Amru)
६) बाग (Bagh)
७) कोटली (Kotli)
८) सियालकोट (Sialkot)
९) मुजफ्फराबाद (Muzaffarabad)
दरम्यान, पाकिस्तानी लष्कराने बुधवारी पहाटे भारताने केलेल्या हल्ल्यांची पुष्टी केली आहे. तसेच, “हल्ल्याला प्रत्युत्तर देणार असल्याचे म्हटले आहे.
पाकिस्तानी लष्कराचे प्रवक्ते लेफ्टनंट जनरल अहमद शरीफ चौधरी (Lt Gen Ahmed Sharif Chaudhry) म्हणाले की, भारताने डागलेल्या क्षेपणास्त्रांनी (Missiles) पीओकेमधील कोटली आणि मुजफ्फराबाद आणि पंजाब प्रांतातील बहावलपूरला लक्ष्य केले. ते म्हणाले, “मी हे स्पष्टपणे सांगू इच्छितो: पाकिस्तान याला त्याच्या सोयीच्या वेळी आणि ठिकाणी प्रत्युत्तर देईल. ही घृणास्पद चिथावणी दुर्लक्षित केली जाणार नाही.”
पाकिस्तानचे पंतप्रधान शेहबाज शरीफ (Shehbaz Sharif) यांनी याला “युद्धाचा कृत्य” (act of war) म्हटले आहे.
दरम्यान, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह (Rajnath Singh), महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) यांच्यासह इतर नेत्यांनी पहलगाम हल्ल्यावरील भारताच्या प्रतिसादाचे कौतुक केले. राजनाथ सिंह यांनी X वर “भारत माता की जय” (Bharat Mata Ki Jai) असे लिहिले.
भारताची ही कारवाई जम्मू-काश्मीरमधील भीषण दहशतवादी हल्ल्यानंतर काही दिवसांनी झाली आहे, ज्यामुळे पाकिस्तानसोबत तणाव वाढला होता. पाकिस्तानस्थित लष्कर-ए-तैयबाच्या (Lashkar-e-Taiba) प्रॉक्सी असलेल्या द रेझिस्टन्स फोर्सने (The Resistance Force – TRF) या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे.
यापूर्वी, पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) आणि इतर केंद्रीय मंत्र्यांनी पहलगाम हल्ल्याला कठोर प्रत्युत्तर देणार असल्याचे म्हटले होते. पंतप्रधान मोदी म्हणाले होते की भारत दहशतवाद्यांचा जगाच्या शेवटपर्यंत पाठलाग करेल.