Padma Award Application | देशातील सर्वोच्च नागरी सन्मानांपैकी एक असलेल्या पद्म पुरस्कारांसाठी (Padma Awards 2026) नामांकन करण्याची अंतिम तारीख 31 जुलै असल्याची माहिती केंद्रीय गृह मंत्रालयाने (Home Ministry India) दिली आहे. हे पुरस्कार प्रजासत्ताक दिन 2026 रोजी घोषित केले जाणार असून, विविध क्षेत्रांतील असामान्य कामगिरी आणि उल्लेखनीय सेवेसाठी हे सन्मान दिले जातात.
केंद्रीय गृह मंत्रालयाने शुक्रवारी प्रसिद्ध केलेल्या निवेदनात नमूद केले की, पद्म पुरस्कारांसाठी ऑनलाईन अर्ज आणि शिफारसींची (Online Padma Award Application) प्रक्रिया 15 मार्च 2025 पासून (Padma Nomination Deadline) सुरू झाली आहे. या पुरस्कारांसाठी नामांकन आणि शिफारसी केवळ राष्ट्रीय पुरस्कार पोर्टल https://awards.gov.in वर ऑनलाईन स्वरूपात स्वीकारल्या जातील.
देशातील सर्वोच्च नागरी सन्मानांमध्ये पद्म पुरस्कार
पद्म पुरस्कारांमध्ये पद्मविभूषण, पद्मभूषण आणि पद्मश्री यांचा समावेश होतो. 1954 मध्ये यांची स्थापना झाली असून दरवर्षी प्रजासत्ताक दिनी हे पुरस्कार जाहीर केले जातात. विविध क्षेत्रांमध्ये केलेल्या ‘उत्कृष्ट कार्यासाठी हे सन्मान दिले जातात.
कोण पात्र आहेत पद्म पुरस्कारासाठी?
पद्म पुरस्कार हे कला, साहित्य, शिक्षण, विज्ञान आणि अभियांत्रिकी, वैद्यक, समाजसेवा, क्रीडा, नागरी प्रशासन, व्यापार आणि उद्योग यांसारख्या क्षेत्रांतील असामान्य कार्यगौरवासाठी दिले जातात. कोणताही जाती, लिंग, पद किंवा व्यवसायाचा भेद न करता कोणतीही व्यक्ती या पुरस्कारासाठी पात्र ठरू शकते. मात्र डॉक्टर आणि वैज्ञानिक वगळता इतर सरकारी सेवक आणि सार्वजनिक उपक्रमांतील कर्मचाऱ्यांना या पुरस्कारासाठी विचारात घेतले जाणार नाही.
‘पीपल्स पद्म’चा सरकारचा उपक्रम
सरकार पद्म पुरस्कारांना ‘पीपल्स पद्म’ (People’s Padma) बनवण्याच्या दिशेने कटिबद्ध आहे. या उद्देशाने सर्व नागरिकांना नामांकन आणि शिफारस करण्यासाठी प्रोत्साहन दिले जात आहे. नागरिक स्वतःचेही नाव प्रस्तावित करू शकतात. महिला, समाजातील दुर्बल घटक, अनुसूचित जाती-जमाती, दिव्यांग व्यक्ती आणि समाजासाठी निस्वार्थ सेवा करणाऱ्या व्यक्तींच्या गुणवत्तेची दखल घेण्यासाठी विशेष प्रयत्न करण्याचे आवाहन सरकारने केले आहे.
नामांकनासाठी आवश्यक माहिती
पद्म पुरस्कारांसाठी (Padma Awards 2026) ऑनलाईन अर्ज आणि शिफारसी 15 मार्च 2025 पासून (Padma Nomination Deadline) सुरू असून, त्या राष्ट्रीय पुरस्कार पोर्टल (https://awards.gov.in) वर करता येणार आहेत. अर्जासोबत संबंधित व्यक्तीच्या उल्लेखनीय कार्याचा 800 शब्दांपर्यंतचा तपशीलवार उतारा आवश्यक आहे.
या संदर्भातील अधिक माहिती https://mha.gov.in या गृह मंत्रालयाच्या वेबसाइटवरील ‘पुरस्कार आणि पदके’ या विभागात तसेच https://padmaawards.gov.in या पद्म पुरस्कार पोर्टलवर उपलब्ध आहे.