गुप्तचर संस्था रॉच्या प्रमुखपदी पराग जैन

Parag Jain, RAW new chief

नवी दिल्ली – भारतीय गुप्तचर संस्था रॉचे (RAW) सध्याचे प्रमुख रवी सिन्हा हे ३० जून रोजी निवृत्त होत आहेत. त्यांच्या जागी केंद्र सरकारने १९८९ बॅचचे पंजाब केडरचे आयपीएस अधिकारी पराग जैन (RAW New Chief) यांची नियुक्ती केली आहे. ते १ जुलैला पदभार स्वीकारणार असून त्यांचा कार्यकाळ दोन वर्षांचा असणार आहे.

पराग जैन हे सध्या एव्हिएशन रिसर्च सेंटरचे प्रमुख (Head of Research Center) म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी ऑपरेशन सिंदूर (Operation Sindoor) दरम्यान पाकिस्तानी सशस्त्र दलांच्या ठिकाणांची व दहशतवादी छावण्यांची गुप्त माहिती शोधण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. त्यांनी भटिंडा, मानसा, होशियारपूर येथे ऑपरेशनल ड्युटी बजावली होती. याआधी ते चंदीगडचे एसएसपी व लुधियानाचे उपमहानिरीक्षक (DIG) होते. रॉमध्ये पाकिस्तान डेस्कचे नेतृत्वही त्यांनी केले आहे. कलम ३७० हटवण्याच्या आणि ऑपरेशन बालाकोटच्या वेळी त्यांनी जम्मू आणि काश्मीरमध्येही काम केले आहे. तसेच कॅनडा आणि श्रीलंका येथे भारतीय प्रतिनिधी म्हणूनही जबाबदाऱ्या सांभाळल्या आहेत.