Home / देश-विदेश / संसदेत ऑपरेशन सिंदूरवर २८-२९ जुलैला १६ तास चर्चा

संसदेत ऑपरेशन सिंदूरवर २८-२९ जुलैला १६ तास चर्चा

नवी दिल्ली – संसदेचे पावसाळी अधिवेशन सुरू असताना, २८ जुलै रोजी लोकसभेत आणि २९ जुलै रोजी राज्यसभेत ऑपरेशन सिंदूरवर (Operation...

By: Team Navakal
Parliament to hold 16-hour debate on Operation Sindoor from July 28-29

नवी दिल्ली – संसदेचे पावसाळी अधिवेशन सुरू असताना, २८ जुलै रोजी लोकसभेत आणि २९ जुलै रोजी राज्यसभेत ऑपरेशन सिंदूरवर (Operation Sindoor) १६-१६ तासांची विशेष चर्चा होणार आहे. काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी (Terrorist attack) हल्ल्यानंतर भारतीय लष्कराने पाकव्याप्त काश्मीरमधील (POK) दहशतवादी तळांवर कारवाई केली होती. तिच्याबद्दल विरोधकांनी अनेक प्रश्न उपस्थित केले होते. या पार्श्वभूमीवर, ऑपरेशनबाबतची सविस्तर माहिती दोन्ही सभागृहांमध्ये दिली जाणार असून त्यावर चर्चा होणार आहे.

विरोधकांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी या गंभीर मुद्द्यावर संसद आणि देशासमोर स्पष्टीकरण द्यावे, अशी मागणी केली आहे. चर्चा सुरू असताना पंतप्रधानांनी सभागृहात उपस्थित राहावे, अशी त्यांची ठाम भूमिका आहे. या मुद्द्यावरून विरोधक गेल्या तीन दिवसांपासून संसदेत गदारोळ करत आहेत.

लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी (Rahul Gandhi) म्हणाले की, ऑपरेशन सिंदूर संपलेले नाही आणि आपण विजयी झालो आहोत, असे पंतप्रधान सांगतात. तर डोनाल्ड ट्रम्प सांगतात की ऑपरेशन सिंदूर मी संपुष्टात आणले. त्यामुळे यात काही तरी गडबड आहे. आपल्या परराष्ट्र धोरणाची या लोकांनी खिल्ली उडवली आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी २५ वेळा सांगितले की, मीच युद्धबंदी घडवून आणली. हे सांगणारे डोनाल्ड ट्रम्प कोण आहेत? पण पंतप्रधान नरेंद्र मोदींनी एकदाही उत्तर दिलेले नाही.

Web Title:
For more updates: , , , , , , , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या