Indian Passport Rules | भारतीय पासपोर्ट अर्जदारांना (Indian Passport Applicants) अनेक वर्षांपासून भेडसावणारी एक अडचण दूर करत, परराष्ट्र मंत्रालयाने (Ministry of External Affairs) महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. नव्या नियमानुसार, आता पती किंवा पत्नी आपल्या पासपोर्टमध्ये (Passport Rule Change) जोडीदाराचं नाव जोडण्यासाठी विवाह प्रमाणपत्र (Marriage Certificate) सादर न करताही अर्ज करू शकतात. त्याऐवजी दोघांनी मिळून स्वाक्षरी केलेलं संयुक्त घोषणापत्र (Annexure J) वैध पर्याय म्हणून स्वीकारलं जाणार आहे.
नव्या नियमानुसार Annexure J वर दोघांच्या स्वाक्षऱ्या असल्या की, ते विवाह प्रमाणपत्राच्या जागी ग्राह्य धरण्यात येईल. यापूर्वी अनेक अर्जदारांना हे प्रमाणपत्र मिळवताना अडचणी येत होत्या, विशेषतः जेथे विवाहाची अधिकृत नोंदणी झालेली नसेल.
राज्यानुसार नोंदणीतील तफावत लक्षात घेऊन निर्णय
एका वरिष्ठ पासपोर्ट अधिकाऱ्याने स्पष्ट केलं की, देशात विवाह नोंदणीच्या पद्धतीत मोठा प्रादेशिक फरक आहे. महाराष्ट्रात (Maharashtra) विवाह सहसा आपोआप नोंदणीकृत होतात, परंतु उत्तर भारतातील अनेक राज्यांमध्ये (North Indian States) तशी सक्ती नाही. त्यामुळे अनेकांना विवाह प्रमाणपत्र उपलब्ध नसतं. हीच अडचण लक्षात घेऊन MEA ने Joint Photo Declaration (Annexure J) पर्याय दिला आहे.
Annexure J मध्ये काय अपेक्षित आहे?
या घोषणापत्रात दोघांची नावं, पत्ता, वैवाहिक स्थिती, आणि ते विवाहित जोडपे म्हणून एकत्र राहत असल्याची माहिती नमूद करावी लागते. फॉर्ममध्ये एक स्वाक्षरी केलेलं संयुक्त छायाचित्र (Joint Photograph) जोडणं अनिवार्य आहे. त्यासोबत ठिकाण आणि दिनांक स्पष्टपणे नमूद करून दोघांनी स्वाक्षरी करावी लागते.
अर्ज करताना आधार क्रमांक (Aadhaar Number), मतदार ओळखपत्र क्रमांक (Voter ID) आणि असल्यास पासपोर्ट क्रमांक (Passport Number) अशा सर्व माहितीची नोंद आवश्यक आहे.
या घोषणापत्रात दिलेली माहिती आणि संयुक्त छायाचित्र पूर्णपणे भरले गेले असतील, तरच हे वैध मानलं जाईल. ही प्रक्रिया विवाह प्रमाणपत्राच्या ऐवजी स्वीकारली जाईल.
नाव काढताना मात्र पूर्वीचे नियम लागू
मंत्रालयाने हे देखील स्पष्ट केलं आहे की, पासपोर्टमधून जोडीदाराचं नाव हटवायचं असल्यास, घटस्फोटाचा पुरावा , पहिल्या जोडीदाराचं मृत्यू प्रमाणपत्र (Death Certificate), किंवा पुनर्विवाह प्रमाणपत्र (Remarriage Certificate) सादर करणं बंधनकारक असेल. दोघांनी स्वाक्षरी केलेलं Annexure J आणि QR कोड-सक्षम आधार पडताळणी असलेलं अद्ययावत ओळखपत्र (Updated ID Proof with Aadhaar) देखील आवश्यक ठरेल.
या बदलामुळे लाखो अर्जदारांना पासपोर्टमध्ये नाव समाविष्ट करताना होणाऱ्या अडचणींवर कायमचा तोडगा मिळण्याची शक्यता आहे.