Tiger Memon : १९९३ च्या मुंबई साखळी बाँबस्फोट (1993 Mumbai bomb blasts)खटल्यातील देशाबाहेर पळालेला दोषी टायगर मेमन याचे कुर्ला येथील दोन फ्लॅट पोलिसांनी जप्त केले आहेत. या जप्तीला आव्हान देणारी मेमनच्या पाच नातेवाईकांनी दाखल केलेली याचिका (petition) नुकतीच मुंबई उच्च न्यायालयाने (Bombay High Court )फेटाळून लावली. जप्त करण्यात आलेल्या या दोन मालमत्तांवर मालकी सांगण्याचा हक्क याचिकाकर्त्यांना नाही, असे न्यायालयाने याचिका फेटाळताना सांगितले.
कुर्ला येथील बाग ए रहमेत (Bagh-e-Rahmat) सहकारी गृहनिर्माण सोसायटीमध्ये एकाच मजल्यावर एकमेकाला लागून असलेले हे दोन फ्लॅट टायगर मेमनचे आई-वडील अब्दुल रजाक सुलेमान मेमन (Abdul Razzak Suleman Memon) आणि हनिफा मेमन (Hanifa Memon)यांनी १९८० मध्ये खरेदी केले होते. १९९२ मध्ये त्यांनी हे फ्लॅट रेश्मा मेमन आणि अन्य नातेवाईकांच्या नावे केले होते. मात्र त्याबद्दलचे कोणतेही कागदोपत्री पुरावे आता टायगर मेमन याच्या नातेवाईकांकडे नाहीत. तसेच हे फ्लॅट अद्याप टायगर मेमनच्या आई-वडिलांच्या नावे असल्याचे सरकारी नोंदीमधून दिसून येते.
१९९३ मध्ये मुंबईत साखळी बाँबस्फोट घडल्यानंतर आणि या कटात टायगर मेमनचा सहभाग आढळून आल्यानंतर पोलिसांनी टायगर मेमन, त्याची पत्नी, आई-वडिलांसह अन्य नातेवाईकांना कारणे दाखवा नोटीस पाठवली होती. त्यानंतर २८ सप्टेंबर १९९३ रोजी पोलिसांनी हे फ्लॅट जप्त(seized) केले होते.
ताज्या बातम्यांसाठी येथे क्लिक करून नवाकाळचे WhatsApp Channel फॉलो करा
हे देखील वाचा –
जीएसटीचे 2 स्लॅब रद्द! कोणत्या वस्तू स्वस्त-कोणत्या वस्तू महाग झाल्या, पाहा संपूर्ण यादी