Mission Sudarshan Chakra: 79 व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त (79th Independence Day) लाल किल्ल्यावरून देशाला संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी भारताची सुरक्षा मजबूत करण्यासाठी एक अत्याधुनिक संरक्षण मोहीम ‘मिशन सुदर्शन चक्र’ (Mission Sudarshan Chakra) सुरू करण्याची घोषणा केली.
दहशतवादी हल्ल्यांपासून देशातील नागरिक आणि धार्मिक स्थळांचे संरक्षण करण्यासाठी ही प्रणाली तयार केली जाणार असल्याचे पंतप्रधान मोदींनी सांगितले.
देशाला संबोधित करताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, ‘भगवान श्रीकृष्ण यांच्याकडून प्रेरणा घेऊन आम्ही ‘सुदर्शन चक्र’चा मार्ग निवडला आहे.’ 2035 पर्यंत ही राष्ट्रीय सुरक्षा प्रणाली अधिक मजबूत, आधुनिक आणि विस्तारित केली जाईल, असेही त्यांनी सांगितले. या संपूर्ण प्रणालीचे संशोधन, विकास आणि उत्पादन भारतातच केले जाईल.
इस्रायलच्या आयर्न डोमशी स्पर्धा
‘मिशन सुदर्शन चक्र’ ही इस्रायलच्या ‘आयर्न डोम’ प्रणालीसारखी असेल, जी हवाई हल्ल्यांपासून बचाव करण्यासाठी ओळखली जाते. 2010 च्या दशकात तैनात केलेल्या आयर्न डोमने पॅलेस्टिनी हमास आणि लेबनॉनच्या हिजबुल्लाहनेडागलेले हजारो रॉकेट यशस्वीरित्या रोखले आहेत.
पंतप्रधान मोदींच्या म्हणण्यानुसार, मिशन सुदर्शन चक्रमध्ये आधुनिकरित्या पाळत ठेवणे, हल्ला रोखणे आणि प्रति-हल्ला करण्याची क्षमता असेल, ज्यामुळे हवाई, भूमी आणि समुद्रातील धोक्यांना त्वरित निष्प्रभ करता येईल.
ऑपरेशन सिंदूर आणि शौर्य पुरस्कार
दरम्यान, 7 मे 2025 रोजी भारताने ‘ऑपरेशन सिंदूर’ (Operation Sindoor) सुरू करून पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील (POK) दहशतवादी तळांना लक्ष्य केले होते. भारतीय लष्कराने 9 दहशतवादी तळ उद्ध्वस्त करून 100 हून अधिक दहशतवाद्यांना कंठस्नान घातले.
स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी ‘ऑपरेशन सिंदूर’मध्ये शौर्य दाखवणाऱ्या जवानांना अनेक पुरस्कार (Awards) जाहीर केले आहेत. यामध्ये 4 कीर्ती चक्र, 15 वीर चक्र आणि 16 शौर्य चक्रांचा समावेश आहे.