Home / देश-विदेश / PM Modi Mother Abuse Words: मोदींच्या आईबद्दल अपशब्द वापरला रालोआचा बिहार बंद! संमिश्र प्रतिसाद

PM Modi Mother Abuse Words: मोदींच्या आईबद्दल अपशब्द वापरला रालोआचा बिहार बंद! संमिश्र प्रतिसाद

PM Modi Mother Abuse Words

PM Modi Mother Abuse Words : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi ) यांच्या आईबद्दल अपशब्द वापरल्याच्या निषेधार्थ राष्ट्रीय लोकशाही आघाडीने (NDA) आज बिहार बंद (Bihar Bandh) पुकारला. या बंदला राज्यातील विविध भागांमध्ये संमिश्र प्रतिसाद मिळाला. काही भागांत बंदामुळे तीव्र आंदोलन व वाहतूक अडचणी निर्माण झाल्या, तर काही भागांत जनजीवन तुलनेने सुरळीत चालू राहिले. दरम्यान, काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या दरभंगा येथील मतदार अधिकार यात्रेदरम्यान एका व्यक्तीने मंचावरून शिवीगाळ (Abuse Words used) केली होती.

बिहारमधील अनेक जिल्ह्यांमध्ये भाजपा, जनता दल युनायटेड (JDU) आणि इतर सहयोगी पक्षांच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरून बंदला पाठिंबा दिला. मात्र भाजपाचे अनेक वरिष्ठ नेते दिल्लीमध्ये कोअर कमिटीच्या बैठकीत असल्याने स्थानिक पातळीवर आंदोलनाला कमी प्रतिसाद मिळाला.

पाटणा शहरातील डाक बंगला चौक आणि आयकर गोलंबर येथे रालोआ कार्यकर्त्यांनी रस्त्यावर बसून आंदोलन केले. सिवानमध्ये वाहतूक ठप्प झाली तर दुकाने बंद ठेवली होती.

कटिहारमध्ये माजी उपमुख्यमंत्री तारकिशोर प्रसाद यांच्या नेतृत्वात कार्यकर्त्यांनी टायर पेटवून जोरदार निषेध आंदोलन केले. यामुळे रस्त्यांवर वाहतुकीला अडचण निर्माण झाली. औरंगाबाद व टंडवा येथे सकाळपासून दुकाने बंद होती कामकाज ठप्प पडले. बांका जिल्ह्यात पंजवारा-गोड्डा राष्ट्रीय महामार्ग पूर्णपणे जाम झाला, बाजारपेठा बंद होत्या. गोपालगंजमध्ये शहरातील दुकाने बंद होती. हाजीपूरमध्ये महिलांनी गांधी चौकात आंदोलन केले. अररिया जिल्ह्यात बंदला संमिश्र प्रतिसाद मिळाला. कुर्साकांटा येथे वाहतूक कोंडी झाली, काही बाजारात सुरळीत व्यवहार सुरू होते.


ताज्या बातम्यांसाठी येथे क्लिक करून नवाकाळचे WhatsApp Channel फॉलो करा


हे देखील वाचा –

मंडल वरून शिवसेना सोडली आता मंत्रिपद सोडणार का? राऊतांचा भुजबळांना सवाल

किम-पुतिन भेटीनंतर जोंग यांच्या ग्लाससह खुर्ची व ठशांची सफाई

कर्जतमध्ये मुस्लीम टाउनशिप मानवाधिकारची सरकारला नोटीस