Home / देश-विदेश / Bangladesh Plane Crash: बांगलादेशमध्ये अहमदाबादची पुनरावृत्ती! शाळेच्या इमारतीवर कोसळले विमान; 20 पेक्षा अधिक जणांचा मृत्यू

Bangladesh Plane Crash: बांगलादेशमध्ये अहमदाबादची पुनरावृत्ती! शाळेच्या इमारतीवर कोसळले विमान; 20 पेक्षा अधिक जणांचा मृत्यू

Bangladesh Plane Crash: बांगलादेशची राजधानी ढाका येथे काल (21 जुलै ) दुपारी एक भीषण विमान अपघात (Bangladesh Plane Crash) झाल्याची...

By: Team Navakal
Bangladesh Plane Crash

Bangladesh Plane Crash: बांगलादेशची राजधानी ढाका येथे काल (21 जुलै ) दुपारी एक भीषण विमान अपघात (Bangladesh Plane Crash) झाल्याची घटना घडली आहे. बांगलादेश हवाई दलाचे एक प्रशिक्षणार्थी विमान एका शाळेच्या इमारतीवर कोसळले. या दुर्घटनेत पायलटसह 26 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून, मृतांमध्ये बहुसंख्य विद्यार्थी आहेत, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

काही दिवसांपूर्वीच भारतात एअर इंडियाचे प्रवासी विमान अशाच प्रकारे कोसळले होते. आता बांगलादेशमध्ये हवाई दलाचे विमान एका शाळेच्या इमारतीवर कोसळले. या घटनेनंतर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांनी दुःख व्यक्त केले. तसेच, सर्व प्रकारची मदत देण्यासाठी तयार असल्याचे त्यांनी म्हटले.

सोशल मीडिया पोस्टमध्ये पंतप्रधान मोदींनी लिहिले की, ढाका येथे झालेल्या दुर्दैवी विमान अपघातातील जीवितहानीमुळे तीव्र धक्क्यासह दुःखी झालो आहे. त्यांच्यापैकी अनेक तरुण विद्यार्थी होते. शोकाकुल कुटुंबांविषयी आम्ही तीव्र संवेदना व्यक्त करतो. अपघातातील जखमींना लवकर बरे वाटावे म्हणून प्रार्थना करतो. या प्रसंगी बांगलादेशासोबत भारत एकजुटीने उभा आहे आणि सर्व प्रकारचा पाठींबा तसेच मदत देण्यासाठी तयार आहे.

दरम्यान, विमान ढाका शहरातील उत्तारा भागात असलेल्या ‘माईलस्टोन स्कूल अँड कॉलेज’च्या इमारतीवर झाला. विमान कोसळल्यानंतर शाळेच्या दोन मजली इमारतीला आग लागली आणि सर्वत्र धूर पसरला. अधिकाऱ्यांनी सांगितले की, 171 लोकांना, ज्यात बहुसंख्य विद्यार्थी होते आणि अनेकांना भाजले होते, त्यांना हेलिकॉप्टर, रुग्णवाहिका, रिक्षा आणि अग्निशमन दलाचे जवान व पालकांच्या मदतीने घटनास्थळावरून सुरक्षित बाहेर काढण्यात आले आणि रुग्णालयात दाखल करण्यात आले.

हा अपघात वर्ग सुरू असतानाच घडल्याने, जखमींची संख्या आणि परिस्थितीची भीषणता वाढली. अपघातग्रस्त विमान चीन-निर्मित F-7 (China-made F-7) प्रकारचे होते, जे बांगलादेश हवाई दलाद्वारे प्रशिक्षणासाठी वापरले जात होते.

बांगलादेशचे मुख्य सल्लागार मुहम्मद युनूस (Muhammad Yunus) यांनी सांगितले की, सरकार या अपघाताच्या कारणांची चौकशी करेल आणि सर्व प्रकारची मदत सुनिश्चित करेल.

Web Title:
For more updates: , , , , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या