Home / देश-विदेश / Rahul Gandhi: ‘निवडणूक आयुक्त अशा लोकांना वाचवत आहेत, जे…’; राहुल गांधींचा मोठा आरोप, सॉफ्टवेअरद्वारे मतदार यादीतून नावे हटवल्याचा दावा

Rahul Gandhi: ‘निवडणूक आयुक्त अशा लोकांना वाचवत आहेत, जे…’; राहुल गांधींचा मोठा आरोप, सॉफ्टवेअरद्वारे मतदार यादीतून नावे हटवल्याचा दावा

Rahul Gandhi on Election Commission of India: काँग्रेसचे खासदार आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी आज (18 सप्टेंबर) पत्रकार...

By: Team Navakal
Rahul Gandhi on Election Commission of India

Rahul Gandhi on Election Commission of India: काँग्रेसचे खासदार आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी आज (18 सप्टेंबर) पत्रकार परिषद घेऊन निवडणूक आयोगावर (Election Commission of India) पुन्हा एकदा अत्यंत गंभीर आरोप केले आहेत. 2023 च्या कर्नाटक विधानसभा निवडणुकीत मोठ्या प्रमाणात मतदारांची नावे हटवण्यात (Voter Deletion) आल्याचा दावा त्यांनी केला आहे.

हे काम राज्याबाहेरील बोगस लॉगिन आणि फोन नंबरचा वापर करून व्यक्तींनी नव्हे तर एका खास सॉफ्टवेअरच्या मदतीने करण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

थेट ज्ञानेश कुमार यांच्यावर निशाणा

राहुल गांधी यांनी थेट मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनाच लक्ष्य केले. “कर्नाटक सीआयडीने (CID) गेल्या 18 महिन्यांत निवडणूक आयोगाला 18 पत्रे पाठवली आहेत आणि माहिती मागवली आहे,” असे त्यांनी सांगितले.

मतदारांची नावे हटवण्यासाठी ज्या डिव्हाइसवरून फॉर्म भरले गेले, त्याचे आयपी (IP) ॲड्रेस आणि ओटीपी (OTP) डिटेल्स देण्याची मागणी सीआयडीने केली आहे. “निवडणूक आयोग ही माहिती देत नाहीत, कारण ही माहिती आपल्याला थेट या प्रकरणाच्या मुळाशी घेऊन जाईल. ज्ञानेश कुमार हे या कारवाया करणाऱ्या लोकांना वाचवत आहेत, याचा हा ठोस पुरावा आहे,” असे म्हणत राहुल गांधींनी गंभीर आरोप केले.

भारताच्या लोकशाहीला नष्ट करणाऱ्या लोकांना मुख्य निवडणूक आयुक्त वाचवत आहेत, असा आरोप देखील त्यांनी केला.

6,018 मतांची चोरी

राहुल गांधी यांनी कर्नाटकच्या अलंद मतदारसंघाचे उदाहरण दिले. “या मतदारसंघात कोणीतरी 6,018 मते हटवण्याचा प्रयत्न केला. 2023 च्या निवडणुकीत अलंदमधून एकूण किती मते हटवली गेली, हे आपल्याला माहीत नाही, पण ही संख्या निश्चितच 6,018 पेक्षा जास्त असेल,” असे ते म्हणाले.

हा प्रकार योगायोगाने उघडकीस आला. एका मतदान केंद्रातील अधिकाऱ्याच्या लक्षात आले की, तिच्या काकाचे नाव मतदार यादीतून हटवले गेले आहे. तिने चौकशी केली असता तिला आढळले की, शेजाऱ्याने हे नाव हटवले आहे. मात्र, शेजाऱ्याने हे आरोप फेटाळून लावले.

राहुल गांधी म्हणाले की, ज्या व्यक्तीने हे नाव हटवले त्यालाही आणि ज्याचे नाव हटवले त्यालाही याची माहिती नव्हती. याचा अर्थ ‘एखाद्या बाहेरील शक्तीने या प्रक्रियेत हस्तक्षेप करून मते हटवली आहेत’.

देशभरात लाखो मतदारांना लक्ष्य

राहुल गांधींनी दावा केला की, ‘भारतामध्ये लाखो लोकांची मते हटवण्यासाठी एक पद्धतशीर प्रयत्न सुरू आहे.’ ते म्हणाले की, काही विशिष्ट समुदायांना, विशेषतः जे लोक विरोधी पक्षाला मतदान करण्याची शक्यता आहे, जसे की दलित, आदिवासी, अल्पसंख्याक आणि ओबीसी, यांना जाणूनबुजून लक्ष्य केले जात आहे. पूर्वी फक्त शंका होती, पण आता आपल्याकडे याचे पूर्ण पुरावे आहेत, असेही त्यांनी सांगितले.

दरम्यान, राहुल गांधी यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले की, हा मतचोरीवरील हायड्रोजन बॉम्ब नाही. हायड्रोजन बॉम्ब अजून यायचा आहे. निवडणुकांमध्ये कशा प्रकारे हेराफेरी केली जाते हे या देशातील तरुणांना दाखवून देण्यासाठी आणि त्यांना समजावून सांगण्यासाठी हा एक महत्त्वाचा टप्पा आहे. मतचोरींवरील हायड्रोजन बॉम्ब लवकरच आणणार असल्याचे त्यांनी सांगितले.

हे देखील वाचा – माणसाचा ‘मेंदू खाणारा अमिबा’ काय आहे? आतापर्यंत 19 जणांचा मृत्यू; जाणून घ्या आजाराची लक्षणे आणि बचावाचे उपाय

Web Title:
संबंधित बातम्या