Home / देश-विदेश / Rajkot Assault: ६ वर्षांच्या मुलीवर अत्याचार अपयशी ! गुप्तांगात राॅड घुसवला

Rajkot Assault: ६ वर्षांच्या मुलीवर अत्याचार अपयशी ! गुप्तांगात राॅड घुसवला

Rajkot Assault:- गुजरातमध्ये राजकोट जिल्ह्यातील अटकोट (Rajkot Assault) येथे ६ वर्षांच्या मुलीवर लैंगिक अत्याचार अपयशी ठरल्याने आरोपीने मुलीच्या गुप्तांगात राॅड...

By: Team Navakal
Rajkot Assault
Social + WhatsApp CTA

Rajkot Assault:- गुजरातमध्ये राजकोट जिल्ह्यातील अटकोट (Rajkot Assault) येथे ६ वर्षांच्या मुलीवर लैंगिक अत्याचार अपयशी ठरल्याने आरोपीने मुलीच्या गुप्तांगात राॅड घुसविण्याचे क्रूरकृत्य केले. या घटनेने परिसरात खळबळ निर्माण झाली. याप्रकरणी पोलिसांनी (Police) रामसिंग तेरसिंग (३०) या आरोपीला अटक केली. त्याच्यावर पोक्सोअंतर्गत (POCSO) गुन्हा दाखल केला.

दाहोद जिल्ह्यातील एक मजूर कुटुंब अटकोट पोलीस ठाण्याअंतर्गत येणाऱ्या एका गावाजवळील शेतात काम करते. ४ डिसेंबर रोजी कुटुंब शेतात काम करत असताना त्यांची सहा वर्षे आठ महिन्यांची मुलगी जवळच खेळत होती. आरोपीने मुलीचे अपहरण केले आणि तिचा गळा दाबून लैंगिक अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. मुलगी ओरडताच त्याने तिच्या गुप्तांगात धारदार रॉडसारखे शस्त्र घुसवले. त्यानंतर मुलीला रक्तबंबाळ अवस्थेत सोडून आरोपी पळून गेला.कुटुंबीयांनी मुलीचा शोध घेतला तेव्हा त्यांना ती रक्ताच्या थारोळ्यात आढळली. तिची गंभीर प्रकृती पाहून कुटुंबीयांनी तिला ताबडतोब राजकोट येथील रुग्णालयात दाखल केले.


राजकोट ग्रामीण पोलीस अधीक्षक विजयसिंह गुर्जर यांनी सांगितले की, याप्रकरणी आरोपीच्या शोधासाठी १० पथके तैनात केली होती. यादरम्यान १०० संशयितांची चौकशी झाली.त्यानंतर सुमारे १० आरोपींना बालरोग तज्ज्ञासह मुलीसमोर हजर केले. तेथे मुलीने मुख्य आरोपी रामसिंग तेरसिंगला ओळखले. त्याला अटक करून गुन्हा दाखल केला.आरोपी गुजरातच्या अटकोट येथे गवंड्याचे काम करतो. त्याला एक मुलगी आणि दोन मुलगे आहेत. आरोपीला घटनेच्या ठिकाणच्या शेजारील शेतातून पकडले.

Web Title:
For more updates: , , , , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या