उत्तर प्रदेशमध्ये केदारनाथ मंदिराच्या प्रतिकृतीमुळे वाद

Kedarnath temple.


लखनौ – उत्तर प्रदेशच्या इटावा जिल्ह्यात (Uttar Pradesh’s Etawah district)उभारण्यात येत असलेल्या केदारनाथ (Kedarnath) मंदिराच्या प्रतिकृतीमुळे वाद (controversy)निर्माण झाला आहे. समाजवादी पार्टीचे अध्यक्ष अखिलेश यादव (Samajwadi Party chief Akhilesh Yadav)यांचे आजोळ असलेल्या सैफाई गावात उभारण्यात येत असलेल्या या मंदिराला प्रमुख हिंदू संघटनांनी (Hindu organizations) तीव्र विरोध केला आहे. या मंदिराचे बांधकाम तत्काळ थांबवावे,असे आवाहन या संघटनांनी केले आहे.


चारधाम तीर्थ पुरोहित महापंचायत (Purohit Mahapanchayat) आणि अखिल भारतीय आखाडा परिषद या हिंदूंच्या दोन प्रमुख धार्मिक संघटनांनी या मंदिराच्या बांधकामावरून (construction)अखिलेश यादव यांच्यावर सडकून टीका केली आहे. २०२७ मध्ये होऊ घातलेल्या राज्य विधानसभेच्या निवडणुकीवर डोळा ठेवून अखिलेश आपल्या राजकारणासाठी (political)धर्माचा वापर करत आहेत,असा आरोप या संघटनांनी केला आहे. केदारनाथ हे भगवान शंकराचे देवस्थान देशातील अत्यंत पवित्र मानल्या जाणाऱ्या बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे. या मंदिराची हुबेहुब प्रतिकृती बनवल्याने मूळ केदारनाथ मंदिराचे पावित्र्य भंग पावते,असा या संघटनांचा आरोप आहे.