Reliance Communications: अनिल अंबानी ‘फ्रॉड’…. संसदेत सरकारचे उत्तर, आता प्रकरण CBI कडे जाणार 

SBI Classifies Reliance Communications As Fraud

SBI Classifies Reliance Communications As Fraud: स्टेट बँक ऑफ इंडियाने (SBI) रिलायन्स कम्युनिकेशन्स (Reliance Communications) व प्रमोटर डायरेक्टर अनिल अंबानी (Anil Ambani) यांना ‘फसवणूक’ म्हणून वर्गीकृत केले आहे. या संदर्भात केंद्रीय अन्वेषण ब्युरोकडे तक्रार दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती सरकारने संसदेत देण्यात आली.केंद्रीय अर्थ राज्यमंत्री पंकज चौधरी यांनी लोकसभेत लेखी उत्तरात याबाबत माहिती दिली. सांगितले.

फसवणूक वर्गीकरण आणि बँकेची प्रक्रिया

रिझर्व्ह बँकेच्या फसवणूक जोखीम व्यवस्थापनावरील मुख्य निर्देश आणि बँकेच्या मंडळाने मंजूर केलेल्या फसवणूक वर्गीकरण, अहवाल आणि व्यवस्थापन धोरणानुसार, 13 जून रोजी या संस्थांना फसवणूक म्हणून वर्गीकृत करण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच, सीबीआयकडे तक्रार दाखल करण्याची प्रक्रियाही सुरू असल्याची माहिती त्यांनी दिली.

स्टेट बँकेचा कर्ज व्यवहार आणि दिवाळखोरी प्रक्रिया

स्टेट बँकेचा रिलायन्स कम्युनिकेशन्समधील कर्ज व्यवहारामध्ये 2,227.64 कोटी रुपयांची निधी-आधारित मूळ थकबाकी रक्कम, 26 ऑगस्ट 2016 पासून जमा झालेले व्याज आणि खर्च, तसेच 786.52 कोटी रुपयांची निधी-रहित बँक हमी समाविष्ट आहे, असे त्यांनी सांगितले.

रिलायन्स कम्युनिकेशन्स दिवाळखोरी आणि नादारी संहिता, 2016 अंतर्गत कॉर्पोरेट दिवाळखोरी निवारण प्रक्रियेतून जात आहे. समाधान योजना कर्जदारांच्या समितीने मंजूर केली होती आणि 6 मार्च 2020 रोजी राष्ट्रीय कंपनी कायदा न्यायाधिकरण, मुंबई येथे दाखल केली होती, आणि राष्ट्रीय कंपनी कायदा न्यायाधिकरणाच्या मंजुरीची प्रतीक्षा आहे.

बँकेने अनिल अंबानी यांच्या विरोधात वैयक्तिक दिवाळखोरी निवारण प्रक्रिया देखील सुरू केली आहे आणि त्याची सुनावणी राष्ट्रीय कंपनी कायदा न्यायाधिकरणयेथे सुरू आहे, असेही त्यांनी सांगितले.