SBI PO Prelims Result 2025: एसबीआय पीओ पूर्व परीक्षेचा निकाल जाहीर, तुमचं नाव आहे का यादीत?

SBI PO Prelims Result 2025 | भारतीय स्टेट बँकेने (SBI) प्रोबेशनरी ऑफिसर (Probationary Officer) पदाच्या भरती प्रक्रियेतील पूर्व परीक्षेचा निकाल रोजी जाहीर केला आहे. 8, 16 आणि 24 मार्च 2025 रोजी ही परीक्षा दिलेल्या उमेदवारांना आपला निकाल SBI च्या अधिकृत संकेतस्थळावर (sbi.co.in) लॉगिन करून पाहता येणार आहे.

निकाल पाहण्यासाठी उमेदवारांना आपला नोंदणी क्रमांक (Registration Number) किंवा रोल नंबर (Roll Number) आणि जन्मतारीख (Date of Birth) किंवा पासवर्ड (Password) वापरावा लागेल.

एसबीआय पीओ भरतीसाठी ही प्रीलियम्स परीक्षा म्हणजेच पहिला टप्पा होता. या परीक्षेत यशस्वी ठरलेले उमेदवार आता मुख्य परीक्षेस पात्र ठरणार असून, त्यानंतर त्यांना मुलाखत व सायकोमेट्रिक चाचणी अशा पुढील टप्प्यांत सहभागी व्हावे लागेल.

निकाल कसा पाहावा?

  • अधिकृत वेबसाइट sbi.co.in ला भेट द्या.
  • होमपेजच्या खाली स्क्रोल करा आणि Careers विभागात क्लिक करा.
  • ‘रिक्रुटमेंट रिझल्ट्स’ (Recruitment Results) वर क्लिक करा.
  • ‘पीओ प्रिलिमिनरी एक्झाम रिझल्ट्स’ (PO Preliminary Exam Results) या लिंकवर क्लिक करा.
  • तुम्हाला लॉगिन पेजवर पुनर्निर्देशित केले जाईल.
  • तुमचा नोंदणी क्रमांक (Registration Number) आणि जन्मतारीख (Date of Birth) टाका.
  • तुमचा निकाल पाहण्यासाठी तपशील सबमिट करा.
  • भविष्यातील संदर्भासाठी तुमचा निकाल डाउनलोड आणि सेव्ह (save) करायला विसरू नका.

यंदाच्या भरती प्रक्रियेअंतर्गत 600 प्रोबेशनरी ऑफिसर पदे भरण्यात येणार आहेत. संपूर्ण निकाल फक्त ऑनलाइन स्वरूपात उपलब्ध असून, कोणत्याही उमेदवारास वैयक्तिकरीत्या निकाल पाठवला जाणार नाही. त्यामुळे निवड झाली आहे की नाही, हे तपासण्यासाठी उमेदवारांनी आपले लॉगिन तपशील वापरून खात्री करणे आवश्यक आहे.