ट्रम्प यांच्या टॅरिफ धोरणामुळे भारतात संताप; सोशल मीडियावर ‘GPay’, ‘PhonePe’ वर बहिष्कार घालण्याची मागणी

Boycott GPay Trend on Social Media

Boycott GPay Trend on Social Media: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी भारताच्या वस्तूंवर 50 टक्के आयात शुल्क (Tariff) लावण्याची घोषणा केली आहे. या घोषणेनंतर भारतात अमेरिकेविरोधात संतापाची लाट उसळली आहे.

भारतासह सोशल मीडियावर हा संताप दिसून येत आहे. अनेक यूजर्स गुगल पे (GPay), फोन पे (PhonePe) सारख्या डिजिटल पेमेंट (Digital Payment) ॲप्सवर बहिष्कार टाकण्याची मागणी केली जात आहे. सोशल मीडियावर ‘बॉयकॉट जीपे’ (#BoycottGPay) हा हॅशटॅग सध्या ट्रेंड होत आहे.

ट्विटरवर संताप

एका यूजरने ‘एक्स’वर लिहिले री, “आम्ही तंत्रज्ञानाच्या विरोधात नाही; पण ढोंगीपणा आणि अनादराच्या विरोधात आहोत. जर तुम्हाला आमचे समर्थन हवे असेल, तर आधी तुम्ही आम्हाला आदर दाखवला पाहिजे. #BoycottGPay”.

अशाच प्रकारे दुसऱ्या एका यूजरने म्हटले आहे, “डेटा ही शक्ती आहे. तुमचा डेटा बाहेरच्यांना देऊ नका. देशात तयार झालेल्या ॲप्सची निवड करा. आत्मनिर्भर भारताची निवड करा. #BoycottGPay”.

जागतिक स्तरावर ‘बॉयकॉट’ची लाट

केवळ भारतातच नाही, तर जगभरात अनेक देशांमध्ये अशा ग्राहक-नेतृत्व असलेल्या मोहिमा सुरू झाल्या आहेत. युरोप (Europe) आणि कॅनडामध्येही (Canada) अमेरिकन उत्पादनांवर बहिष्कार घालण्याचे आवाहन केले जात आहे. टेस्लाच्या गाड्यांपासून ते किराणा मालापर्यंत अमेरिकन वस्तू टाळण्याचा प्रयत्न सुरू आहे. ‘

‘एक्स’ आणि गुगलवर #BoycottUSA सारखे ट्रेंड पाहायला मिळत आहे. दरम्यान, काही दिवसांपूर्वी ट्रम्प यांनी भारताची अर्थव्यवस्था मृतावस्थेत असल्याचे म्हटले होते. त्यानंतर आता त्यांनी भारतावर 50 टक्के आयात शुल्क लादण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे भारत आणि अमेरिकेत ट्रेड वॉर सुरू होण्याची शक्यता आहे.

Share:

More Posts