Home / देश-विदेश / Adani Group : सोनप्रयाग- केदारनाथ रोप वे ! ४ हजार कोटींचे कंत्राट अदानीला

Adani Group : सोनप्रयाग- केदारनाथ रोप वे ! ४ हजार कोटींचे कंत्राट अदानीला

Adani Group : उत्तराखंडमधील केदारनाथ (Kedarnath) आणि सोनप्रयागला जोडणाऱ्या महत्वाकांक्षी रोप-वे प्रकल्पाचे कंत्राट अदानी एन्टरप्रायझेस लिमिटेड (to Adani Enterprises Ltd,)...

By: Team Navakal
Adani Group’s


Adani Group : उत्तराखंडमधील केदारनाथ (Kedarnath) आणि सोनप्रयागला जोडणाऱ्या महत्वाकांक्षी रोप-वे प्रकल्पाचे कंत्राट अदानी एन्टरप्रायझेस लिमिटेड (to Adani Enterprises Ltd,) या अदानी समूहातील कंपनीला मिळाले आहे. या प्रकल्पासाठी ४ हजार ८१ कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे.

अदानी समूहातील कंपनीचा हा पहिलाच रोप वे (ropeway) आहे. उत्तराखंडच्या(Uttarakhand) रुद्रप्रयाग जिल्ह्यातील सोनप्रयाग हे गाव केदारनाथ तीर्थयात्रेच्या मार्गातील एक महत्वाचे स्थान आहे. १२.९ किलोमीटर लांबीच्या रोप-वेमुळे सोनप्रयाग आणि केदारनाथ थेट जोडले जाणार आहेत.


राष्ट्रीय रोप-वे विकास कार्यक्रम पर्वतमाला परियोजनाच्या माध्यमातून सरकार आणि सार्वजनिक भागिदारी तत्त्वावर हा प्रकल्प उभारण्यात येणार आहे. हा रोप-वे तयार झाल्यानंतर सोनप्रयाग ते केदारनाथ हा सुमारे नऊ तासांचा खडतर मार्ग अवघ्या ३६ मिनिटांत पार करता येणार आहे. एकावेळी एका दिशेने प्रतितास १ हजार ८०० यात्रेकरूची ने-आण करण्याची क्षमता या रोप-वेची असणार आहे. लाखो भाविकांना या सेवेचा लाभ होणार आहे.


हे देखील वाचा –

साताऱ्यात चमत्कार! एकाच वेळी 4 अपत्यांना जन्म, महिला 7 मुलांची आई

‘दशावतार’चा बॉक्स ऑफिसवर धमाका, आता अवघ्या 99 रुपयात पाहा चित्रपट; प्रेक्षकांसाठी खास ऑफर

रेल्वे तिकीट बुक करताय? IRCTC च्या नियमांमध्ये मोठा बदल; जाणून घ्या

Web Title:
संबंधित बातम्या