तामिळनाडूत बसला ट्रेनच्या धडकेत २ विद्यार्थ्यांचा मृत्यू

Tamil Nadu bus-train collision 2 students died

चेन्नई – तामिळनाडूमधील चिदंबरम येथील सेम्मानगुप्पम येथे आज रेल्वे फाटक पार करत असताना शाळेच्या बसला ट्रेनने (School bus and train accident) जोरदार धडक दिली. त्यामुळे बसचा अक्षरशः चुराडा झाला. या दुर्दैवी अपघातात दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू (Two students died) झाला असून अनेक विद्यार्थी जखमी झाले आहेत.

ही दुर्घटना सकाळी ७ वाजताच्या सुमारास घडली. विद्यार्थी असलेली शाळेची बस रेल्वे फाटक ओलांडत होती. तेवढ्यात येणाऱ्या ट्रेनने (Train) शाळेच्या बसला धडक दिली. या धडकेनंतर बस सुमारे ५० मीटरपर्यंत फरफटत गेली. ज्यामुळे बसमधील अनेक विद्यार्थी खाली पडले आणि गंभीर जखमी (Injured)झाले.

अपघातानंतर घटनास्थळी पोलीस (Police) आणि स्थानिक प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी धाव घेतली आणि तत्काळ मदत व बचावकार्य सुरू करण्यात आले. जखमी विद्यार्थ्यांना कडलूर येथील सरकारी रुग्णालयात (Government hospital) दाखल करण्यात आले असून, काहींची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती आहे.या घटनेमुळे परिसरात हळहळ होत आहे.