Tesla India Price | जगातील सर्वात मोठी इलेक्ट्रिक वाहन उत्पादक कंपनी टेस्लाने (Tesla India Price) नुकतेच भारतीय बाजारात आपल्या बहुप्रतिक्षित ‘मॉडेल Y’ एसयूव्हीला लाँच केले आहे. मात्र, या इलेक्ट्रिक कारची भारतात एन्ट्री झाली असली तरीही मात्र किंमतीवरून नाराजी व्यक्त केली जात आहे.
इतर देसातील किंमतीच्या तुलनेत भारतातील ‘मॉडेल Y’ ची (Tesla Model Y India Price) किंमत खूपच जास्त असल्याचे अनेकांचे म्हणणे आहे. अनेकजण यावरून सोशल मीडियावर नाराजी व्यक्त करत आहे.
टेस्लाच्या भारतीय वेबसाइटवर आता ‘मॉडेल Y’ चे दोन व्हेरिएंट उपलब्ध आहेत. यातील स्टँडर्ड रियर-व्हील ड्राइव्हची किंमत 59.89 लाख रुपये आणि लॉन्ग रेंज रियर-व्हील ड्राइव्हची किंमत 67.89 लाख रुपये आहे.
भारतातील किंमत जास्त
भारतातील किमत अमेरिकेतील ‘मॉडेल Y’ (Tesla Model Y India Price) च्या किमतींपेक्षा खूप जास्त आहेत. अमेरिकेत हेच वाहन सुमारे 32 लाखांमध्ये विकले जाते, ज्यात केंद्र सरकारकडून कर सवलत दिली जाते. किमतीतील या प्रचंड फरकामुळे सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात संताप व्यक्त होत आहे.
एका यूजर्सने सोशल मीडियावर लिहिले की, भारतीय खरेदीदार अमेरिकेतील किमतीपेक्षा सुमारे 29 लाख रुपये अधिक कर भरत आहेत. त्याने म्हटले, “टेस्लाने ‘मॉडेल Y’ भारतात 61 लाख रुपये किमतीत लाँच केली आहे. हे मॉडेल अमेरिकेत 32 लाखांमध्ये विकले जाते आणि खरेदी करताना तुम्ही भारतीय सरकारला 29 लाख रुपये कर द्याल. भारताच्या विकास कथेत तुमच्या योगदानाबद्दल धन्यवाद.”
दुसऱ्या यूजरने पोस्टमध्ये लिहिले की, “जर तुम्ही भारतात टेस्ला मॉडेल Y खरेदी केले, तर तुम्ही कंपनीला सुमारे 33 लाख रुपये आणि सरकारला कर म्हणून 28 लाख रुपये द्याल. जर ही कर-वसुली नसेल, तर मला माहित नाही याला काय म्हणावे.”
आणखी एका यूजरने लिहिले की, “जवळजवळ अर्धी किंमत कर आहे. टेस्लाऐवजी, भारतात याला ‘टॅक्स-ला’ म्हटले पाहिजे.” तर दुसऱ्याने लिहिले, “मॉडेल Y ची किंमत आयात शुल्क आणि/किंवा इतर करांमुळे दुप्पट झाली आहे. रोड टॅक्स, विमा, जीएसटी इत्यादी जोडले जातील. जोपर्यंत टेस्ला भारतात उत्पादन किंवा किमान असेंबलिंग सुरू करत नाही, तोपर्यंत ते यशस्वी होणार नाही.”
उच्च आयात शुल्क हेच मुख्य कारण
या अवाढव्य किमतीमागे भारतातील पूर्णपणे तयार केलेल्या युनिट्सवर असलेले उच्च आयात शुल्क हे मुख्य कारण आहे. टेस्ला सध्या भारतात असेंबल केलेली वाहने आयात करत आहे, ज्यामुळे ‘मॉडेल Y’ वर मोठ्या प्रमाणात शुल्क आकारले जात आहे.
40 लाखांपेक्षा जास्त मूल्य असलेल्या गाड्यांवर 100% आयात शुल्क लावले जाते, तर या मर्यादेखालील किमतीच्या गाड्यांवर 70% शुल्क आकारले जाते. या शुल्क रचनेमुळे ‘मॉडेल Y’ ची अंतिम किंमत वाढते, ज्यामुळे ती टेस्लाच्या मूळ बाजारपेठेपेक्षा जवळजवळ दुप्पट महाग होते.
हे देखील वाचा –