भारतातील सर्वात सुरक्षित शहरांची क्रमवारी जाहीर, महाराष्ट्रातील ‘या’ शहरांचा टॉप-10 मध्ये समावेश

Safest Cities in India

Safest Cities in India: जगातील सर्वात सुरक्षित देशांच्या यादीत 67व्या क्रमांकावर आहे. नुम्बेओ सेफ्टी इंडेक्स (Numbeo Safety Index) 2025 ने जगातील सर्वात सुरक्षित देश आणि शहरांची यादी जाहीर केली आहे.

शहरांच्या बाबतीत भारताने (Safest Cities in India) चांगली कामगिरी केली आहे. या यादीनुसार, मंगळूर हे भारतातील सर्वात सुरक्षित शहर ठरले असून, कमी गुन्हेगारी दरामुळे ते जागतिक क्रमवारीत 49 व्या स्थानावर आहे. तसेच, भारतातील टॉप 10 शहरांमध्ये महाराष्ट्रातील पुणे आणि नवी मुंबईचा देखील समावेश आहे.

गुजरातमधील वडोदरा (69.2), अहमदाबाद (68.2) आणि सुरत (66.6) ही मंगळूरनंतर सर्वात सुरक्षित शहरांमध्ये आहेत. दुसरीकडे, देशाची राजधानी नवी दिल्ली, नोएडा आणि गाझियाबाद ही असुरक्षित शहरांच्या यादीत आहेत. महिलांच्या सुरक्षेबाबत वाढलेली चिंता आणि गुन्हेगारीमुळे ही शहरे यादीत तळाशी आहेत.

दिल्लीचा गुन्हेगारी निर्देशांक (Crime Index) 59.03, गाझियाबादचा 58.44 आणि नोएडाचा 55.1 आहे.

भारतातील 10 सर्वात सुरक्षित शहरे

जागतिक क्रमभारतातील क्रमशहर, राज्यसुरक्षा निर्देशांकगुन्हेगारी निर्देशांक
491मंगळूर, कर्नाटक74.225.8
852वडोदरा, गुजरात69.230.8
933अहमदाबाद, गुजरात68.231.8
1064सुरत, गुजरात66.633.4
1185जयपूर, राजस्थान65.234.8
1286नवी मुंबई, महाराष्ट्र63.536.5
1497तिरुवनंतपुरम, केरळ61.138.9
1588चेन्नई, तामिळनाडू60.339.7
1679पुणे, महाराष्ट्र58.741.3
17510चंदीगड57.442.6

जगातील सर्वात सुरक्षित शहरे

या यादीत मध्यपूर्वेतील अनेक शहरांनी सुरक्षा आणि स्थिरतेसाठी जागतिक ओळख मिळवली आहे. जगातील 10 सर्वात सुरक्षित शहरांमध्ये या भागातील 5 शहरांचा समावेश आहे. संयुक्त अरब अमिरातीची राजधानी अबु धाबी (Abu Dhabi) 88.8 च्या सुरक्षा निर्देशांकासह सलग नवव्या वर्षी पहिल्या स्थानावर आहे.

जगातील 10 सर्वात सुरक्षित शहरे 2025:

क्रमशहर, देशसुरक्षा निर्देशांक
1अबु धाबी, संयुक्त अरब अमिरात88.8
2दोहा, कतार84.3
3दुबई, संयुक्त अरब अमिरात83.9
4शारजा, संयुक्त अरब अमिरात83.7
5ताइपेई, तैवान83.6
6मनामा, बहरीन81.3
7मस्कत, ओमान81.1
8द हेग, नेदरलँड्स80.0
9ट्रॉनहेम, नॉर्वे79.3
10आइंडहोवन, नेदरलँड्स79.1