Trump Shares AI Video of Obama’s Arrest
वॉशिंग्टन – अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड(President Trump)ट्रम्प यांनी माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा(Obama arrest deepfake) यांच्या अटकेचा एआय व्हिडिओ समाजमाध्यमावर शेअर केला. ही पोस्ट शेअर केल्यानंतर नेटकऱ्यांनी त्यांच्यावर टीकेची झोड उठवली.(Trump)
या व्हायरल व्हिडिओची सुरुवात ओबामा यांच्या राष्ट्रपती अथवा अन्य कोणी कायद्यापेक्षा मोठे नाही या वाक्याने होते. (AI-generated Obama arrest)तर पुढे जो बायडेन यांच्यासह काही डेमोक्रेटिक राजकीय नेत्यांचे व्हिडिओ जोडलेले आहेत. ज्यामध्ये सर्व कोणीही कायद्यापेक्षा मोठे नसल्याचे विधान करतात. त्यानंतर या व्हिडिओत राष्ट्राध्यक्ष ट्रम्प आणि ओबामा व्हाईट हाऊसच्या ओव्हल ऑफिसमध्ये बसलेले आहेत. तेथे ३ एफबीआय एजंट्स येतात आणि ओबामा यांची कॉलर पकडून खाली पाडतात. त्यांच्या हातात बेड्या घालतात. या सगळ्यावर शेजारी बसलेले ट्रम्प हसत असतात. शेवटी ओबामा कैद्याच्या वेशात तुरुंगाच्या कोठडीत फेऱ्या मारताना दाखवले आहेत.
या व्हिडिओमुळे ट्रम्प यांच्यावर टीका करतांना नेटकऱ्यांनी या गोष्टीला एपस्टाईन प्रकरणावरून लक्ष हटवण्याचा प्रयत्न असल्याचे म्हटले. तर राष्ट्राध्यक्षांनी असा बनावट व्हिडिओ शेअर करणे हे एक बेजबाबदार कृत्य असल्याचेही म्हटले.