US India Trade Deal: भारत आणि अमेरिकेत (US India Trade Deal) गेल्याकाही दिवसांपासून व्यापार करारावर चर्चा सुरू आहे. मात्र, हा करार अद्याप अंतिम झालेला नाही. त्यातच आता अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump Tariffs) यांनी भारताला 25 टक्के अतिरिक्त आयात शुल्क लागू करण्याचा इशारा दिला आहे.
भारत आणि अमेरिका यांच्यातील दीर्घकाळापासून प्रलंबित असलेला व्यापार करार लवकर पूर्ण झाला नाही, तर भारतीय आयातींवर 25टक्क्यांपर्यंत आयात शुल्क लावण्याचा इशारा ट्रम्प यांनी दिला आहे.
“होय, मला वाटते. भारत… चांगला मित्र आहे. पण ते 25 टक्के शुल्क देणार आहेत.”, असे एका प्रश्नाला उत्तर देताना ट्रम्प यांनी म्हटले आहे.
अमेरिकेचे व्यापार प्रतिनिधी जॅमिसन ग्रीर यांनी सांगितले की, भारतासोबतच्या करारासाठी अधिक चर्चा आवश्यक आहेत. भारताने काही बाजारपेठा उघडण्याची तयारी दाखवली असली तरी अंतिम करारासाठी अजून वाटाघाटी व्हाव्या लागतील.
ट्रम्प यांची नाराजी का?
ट्रम्प यांनी भारताशी असलेल्या व्यापारी संबंधांना “अतिशय कठीण” असे म्हटले आहे. भारताचे शुल्क दर खूप जास्त असून, अमेरिका भारतात वस्तू विकण्याचा प्रयत्न करताना अडचणीत येत असल्याची तक्रार ट्रम्प यांनी यापूर्वीही अनेकदा केली आहे.
भारत सरकारकडून डिजिटल सेवा कर आणि आयातीवरील अटींमुळे निर्माण होणाऱ्या अडथळ्यांविषयी व्हाईट हाऊसने नाराजी व्यक्त केली आहे. ट्रम्प यांच्या म्हणण्यानुसार भारत हा जगातील सर्वाधिक शुल्क आकारणारे देशांपैकी एक आहे.
भारताचा प्रतिसाद आणि चर्चा
भारतीय वाणिज्य मंत्रालयाने ऑगस्टपूर्वी करार होण्याची शक्यता व्यक्त केली होती. मात्र परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी ट्रम्प यांचा शून्य शुल्क कराराचा दावा “वेळेपूर्वीचा” असल्याचे सांगितले.
जयशंकर यांनी स्पष्ट केलं की, भारत आणि अमेरिकेतील चर्चेला अजून वेळ लागणार असून, सर्व मुद्दे अजूनही चर्चेअंती आहेत. या वाटाघाटी गुंतागुंतीच्या आणि संवेदनशील आहेत.
अमेरिकेने गेल्या वर्षी भारतातून ८७ अब्ज डॉलर्सच्या वस्तू आयात केल्या होत्या, तर भारताने अमेरिकेतून ४२ अब्ज डॉलर्सच्या वस्तू विकत घेतल्या. ही तफावत आणि वाढती व्यापार तूट यामुळे ट्रम्प भारताने लवकरात लवकर करार करावा, अशी मागणी करत आहेत.
हे देखील वाचा –
जगभरात भारतीय वंशाच्या नागरिकांचा डंका! P&G च्या CEO पदी शैलेश जेजुरीकर यांची निवड
अनिल परबांनी मुख्यमंत्र्यांना योगेश कदमांविरोधात पुरावे दिले