Trump-Zelenskyy Meeting: ट्रम्प-झेलेन्स्कींची खाजगी भेट चर्चेत, रशिया-युक्रेन युद्धावर युद्धावर तोडगा निघणार?

Trump-Zelenskyy Meeting

Trump-Zelenskyy Meeting | रशिया-युक्रेन युद्ध थांबवण्यासाठी अमेरिकेकडून मध्यस्थी केली जात आहे. याच पार्श्वभूमीवर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) आणि युक्रेनचे अध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की (Volodymyr Zelenskyy) यांची व्हॅटिकनमध्ये (Vatican)भेच झाली.

वर्षी फेब्रुवारीत ओव्हल ऑफिसमध्ये (Oval Office) झालेल्या तणावपूर्ण भेटीनंतर ही दोघांची पहिलीच प्रत्यक्ष भेट ठरली. दोन्ही देशांच्या प्रमुख नेत्यांमधील चर्चा “खूप उत्पादक” झाल्याची माहिती व्हाइट हाऊसने दिली.

झेलेन्स्की यांच्या कार्यालयानुसार, सेंट पीटर बॅसिलिका (St Peter’s Basilica) मध्ये दोन्ही नेत्यांमध्ये जवळपास 15 मिनिटं चर्चा झाली. व्हाइट हाऊसचे कम्युनिकेशन डायरेक्टर स्टीव्हन चेउंग यांनी सांगितले की, “राष्ट्राध्यक्ष ट्रम्प आणि राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांच्यात खाजगी बैठक झाली आणि ही चर्चा अत्यंत उत्पादक ठरली.” बैठकीचे अधिक तपशील लवकरच जाहीर केले जाणार आहेत.

झेलेन्स्की यांचे चीफ ऑफ स्टाफ अँड्री येरमक यांनीही या 15 मिनिटांच्या बैठकीला “रचनात्मक” असे संबोधले, परंतु त्यांनीही अधिक तपशील दिले नाहीत. पोप फ्रान्सिस यांच्या अंत्यसंस्कारासाठी (Funeral of Pope Francis) हे नेते व्हॅटिकनमध्ये जमले होते. अमेरिका युक्रेन-रशिया संघर्ष (Ukraine-Russia conflict) संपवण्यासाठी प्रयत्नशील असताना ही भेट झाली आहे.

ट्रम्प यांचा पुतिनवर तीव्र हल्ला:

अंत्यसंस्कारानंतर ट्रम्प एअर फोर्स वन (Air Force One) मधून रोममधून रवाना झाले. त्यांनी त्यांच्या ट्रुथ सोशल प्लॅटफॉर्मवर एक पोस्ट केली. त्यांनी रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्यावर नागरी क्षेत्रांवर क्षेपणास्त्रे डागल्याबद्दल कठोर टीका केली आहे. ट्रम्प यांनी लिहिले, “गेल्या काही दिवसांत पुतिन यांनी नागरी भागांवर केलेले हल्ले निरर्थक आहेत. खूप लोक मरत आहेत.”

याआधी ट्रम्प अनेकदा पुतिनसाठी सौम्य भूमिका घेत असताना झेलेन्स्की यांच्यावर टीका करत होते. मात्र या वेळी त्यांनी झेलेन्स्की यांच्याशी सकारात्मक संवाद साधल्याचे स्पष्ट केले.

झेलेन्स्की यांच्या कार्यालयाने जारी केलेल्या छायाचित्रांमध्ये, ट्रम्प आणि झेलेन्स्की एका भव्य हॉलमध्ये एकमेकांसमोर बसलेले दिसतात. त्यांच्या सभोवताली कोणतेही सहाय्यक दिसले नाहीत. दुसऱ्या एका छायाचित्रात, युक्रेनचे अध्यक्ष अमेरिकन, ब्रिटिश आणि फ्रेंच नेत्यांसोबत उभे असलेले दिसतात.

तणावमुक्त चर्चेअंती ट्रम्प यांनी रशियन अधिकाऱ्यांशी थेट चर्चेचे आवाहन करताना सांगितले की, दोन्ही बाजूंनी शांततेसाठी वाटाघाटी कराव्यात. मात्र अमेरिकेच्या प्रस्तावांमध्ये — विशेषतः क्रिमिया रशियाला मान्यता देण्याच्या मुद्द्यावर युक्रेन आणि युरोपियन राष्ट्रांचा तीव्र विरोध कायम आहे. आर्थिक नुकसान भरपाई, सुरक्षा हमी आणि निर्बंध सवलतींसंदर्भातही मतभेद वाढले आहेत.