अहमदाबादमधील एअर इंडियाच्या घटनेची पुनरावृत्ती टळली! विमान हवेत असतानाच पायलटने दिला ‘मेडे’ कॉल; नक्की काय घडले?

Boeing 787-8 Dreamliner Mayday Call

Boeing 787-8 Dreamliner Mayday Call: काही दिवसांपूर्वी अहमदाबाद (Air India Flight 171 Plane Crash) येथे झालेल्या विमान अपघातात 250 पेक्षा अधिक जणांना प्राण गमवावे लागले होते. बोइंग 787-8 ड्रीमलाइनर हे विमान कोसळून हा अपघात झाला होता. त्यानंतर बोइंगच्या ड्रीमलाइनर विमानातील त्रुटीविषयी सातत्याने प्रश्न विचारले जात आहेत. आता या विमानाशी संबंधित आणखी एक घटनासमोर आली आहे.

अमेरिकेतून जर्मनीतील म्युनिचकडे निघालेल्या युनायटेड एअरलाईन्सच्या (Boeing 787-8 Dreamliner Mayday Call) विमानात उड्डाणानंतर काही मिनिटांतच मोठी तांत्रिक अडचण निर्माण झाली. वॉशिंग्टन डलेस विमानतळावरून निघालेल्या बोइंग 787-8 ड्रीमलायनर या विमानाच्या डाव्या बाजूच्या इंजिनमध्ये बिघाड झाल्याने वैमानिकांनी तात्काळ इमर्जेन्सी जाहीर करत विमान पुन्हा वॉशिंग्टनला वळवले.

मेडे कॉलनंतर एटीसीशी समन्वय

विमानाने अवघ्या 5,000 फूट उंची गाठल्यानंतर वैमानिकांनी ‘मेडे’ कॉल दिला आणि हवाई वाहतूक नियंत्रकांशी जवळून समन्वय साधला. सुरक्षा लक्षात घेता, विमान वॉशिंग्टनच्या एका विशेष मार्गावर फिरत राहिले आणि इंधन कमी करण्यासाठी त्याला 6,000 फूट उंचीवर ठेवण्यात आले. या कालावधीत एटीसी आणि वैमानिकांमध्ये सतत संवाद सुरू होता.

इंधन टाकून सुरक्षित लँडिंग

इंधन सुमारे पूर्णपणे टाकल्यानंतर वैमानिकांनी धावपट्टी क्रमांक 19 सेंटरवर इन्स्ट्रुमेंट लँडिंग सिस्टमच्या सहाय्याने उतरायची परवानगी मागितली. अखेर, विमान सुरक्षितपणे वॉशिंग्टन डलेस विमानतळावर उतरले. इंजिन निकामी झाल्यामुळे, विमान स्वतःहून धावपट्टीवरून हलू शकले नाही आणि सुरक्षितपणे उतरल्यानंतर त्याला धावपट्टीवरून ओढून करून बाहेर काढावे लागले. सुदैवाने, या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.

ही घटना अहमदाबादमधील अलीकडील एअर इंडियाच्या विमान अपघाताशी (Air India crash) मिळतीजुळती आहे, जिथे बोइंग 787-8 ड्रीमलायनरला उड्डाणानंतर लगेचच गंभीर इंजिन बिघाडाचा अनुभव आला होता. अशा घटनांमुळे या विमान प्रवासाच्या सुरक्षिततेबाबत पुन्हा चर्चा सुरू झाली आहे.

हे देखील वाचा –

अनिल परबांनी मुख्यमंत्र्यांना योगेश कदमांविरोधात पुरावे दिले

महाराष्ट्र राज्य सहकारी संघावर भाजपाचे वर्चस्व; दरेकरांकडे एकहाती सत्ता