चीनचा अमेरिकेवर ‘कृषी दहशतवादी’ हल्ल्याचा प्रयत्न? धोकादायक जैविक रोगकारकाची तस्करी करताना दोघांना अटक

Chinese Arrested For Smuggling Biological Pathogen Into US

Chinese Arrested For Smuggling Biological Pathogen Into US | अमेरिकेत दोन चिनी नागरिकांवर धोकादायक जैविक रोगकारक तस्करी करून संशोधनासाठी वापरण्याचा आरोप केला आहे. या रोगकारकाचा वापर कृषी दहशतवादासाठी शस्त्र म्हणून केला जाण्याची शक्यता असल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.

रिपोर्टनुसार, या रोगकारकाची ओळख ‘फ्युसेरियम ग्रॅमिनेरम’ (Fusarium graminearum) अशी झाली असून, वैज्ञानिक साहित्यात संभाव्य जैविक धोका म्हणून वर्गीकृत केला जातो. हा बुरशीजन्य रोग पिकांमध्ये ‘हेड ब्लाइट’ नावाचा आजार निर्माण करतो आणि यामुळे दरवर्षी अब्जावधी डॉलर्सचे आर्थिक नुकसान होऊ शकते.

याचे विषारी घटक मानव आणि प्राण्यांमध्ये उलट्या, यकृताचे नुकसानआणि प्रजनन समस्या निर्माण करू शकतात.

एफबीआयनुसार झुनिओंग लिऊ हा संशोधकाने जुलै 2024 मध्ये अमेरिकेत येऊन मिशिगन विद्यापीठाच्या प्रयोगशाळेत संशोधनासाठी या रोगकारकाची तस्करी केली. त्याची गर्लफ्रेंड युनकिंग जियान याच प्रयोगशाळेत काम करत असल्याने, तिनेही या योजनाला सहकार्य केल्याचे पुराव्यांवरून स्पष्ट झाले आहे.

चिनी सरकारशी संबंध, राष्ट्रीय सुरक्षेसाठी धोका?

जियानला चिनी सरकारकडून संशोधनासाठी निधी मिळाल्याचे समोर आले आहे. तसेच तिच्या इलेक्ट्रॉनिक्स डिव्हाइसमध्ये चिनी कम्युनिस्ट पक्षाशी संबंध दर्शवणारे पुरावे आढळले आहेत.

एफबीआयच्या डेट्रॉईट फील्ड ऑफिसचेविशेष एजंट चेव्होरीया गिब्सन यांनी या कृतीमुळे सार्वजनिक सुरक्षेला तात्काळ धोका निर्माण झाल्याचे स्पष्ट केले आहे. अमेरिकेचे ॲटर्नी जेरोम एफ. गॉर्गोन जूनियर यांनी या घटनेला राष्ट्रीय सुरक्षेसाठी अत्यंत गंभीर धोका असल्याचे म्हटले आहे.

एफबीआयचे संचालक काश पटेल (Kash Patel) यांनी चिनी कम्युनिस्ट पक्ष अमेरिकेतील अन्न पुरवठा आणि संशोधन संस्थांमध्ये घुसखोरी करण्यासाठी गुप्तहेर (operatives) आणि संशोधक तैनात करत असल्याचा आरोप केला.

या प्रकरणाचा एफबीआय आणि यूएस कस्टम्स अँड बॉर्डर प्रोटेक्शनद्वारे संयुक्तपणे तपास सुरू आहे.