Video: भारतीय महिलेने अमेरिकेत केली 1 लाखांच्या वस्तूंची चोरी; आता USA दूतावासाने दिला गंभीर इशारा

US Indian Woman Supermarket Theft

US Indian Woman Supermarket Theft | अमेरिकेला भेट देणाऱ्या भारतीयांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. अमेरिकेतील भारतीय दूतावासानं व्हिसा अर्जदारांसाठी नवीन सूचना जारी (Indian Traveler Advisory) केल्या असून, हल्ला, चोरी किंवा घरफोडीसारख्या कृत्यांपासून दूर राहण्याचा सल्ला दिला आहे.

एका भारतीय महिलेला अमेरिकेत चोरी करताना पकडल्यानंतर अमेरिकेतील भारतीय दूतावासाने सूचना जारी केल्या आहेत. या भारतीय महिलेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

एका भारतीय महिलेला इलिनॉयमधील एका टार्गेट स्टोअरमध्ये सुमारे 1.1 लाख रुपये किंमतीच्या वस्तू चोरताना पकडण्यात आले. या घटनेनंतर दूतावासानं स्पष्ट केलं की, अमेरिकेत कायदा सुव्यवस्थेचं पालन करणं अनिवार्य आहे. जर कोणी हल्ला, चोरी किंवा घरफोडीत सहभागी झाला, तर त्याचा व्हिसा रद्द होऊ शकतो आणि भविष्यात अमेरिकेत प्रवेशासाठी तो अपात्र ठरू शकतो. दूतावासानं सांगितलं की, परदेशी पर्यटकांकडून अमेरिकेच्या सर्व कायद्यांचं काटेकोर पालन अपेक्षित आहे.

व्हायरल झालेल्या व्हिडिओत, ही महिला अधिकाऱ्यांकडे वस्तूंसाठी पैसे देण्याची विनंती करताना दिसते., “मी पैसे भरायला तयार आहे, त्यात काय नुकसान आहे?”, असे महिला म्हणताना दिसत आहे. पण अधिकाऱ्यांनी उत्तर दिलं की, ती दुकानाबाहेर पडल्यानंतरच हा प्रकार घडला, त्यामुळे आता कायदेशीर कारवाई टाळता येणार नाही. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर दूतावासानं हा इशारा काढला आहे.

दरम्यान, अमेरिकेने व्हिसा अर्जदारांच्या सोशल मीडिया खात्यांची कठोर तपासणी सुरू केली आहे. गेल्या महिन्यात एका भारतीय विद्यार्थ्याला विमानतळावर ताब्यात घेऊन परत पाठवण्यात आलं होतं, ज्यामुळे बेकायदेशीर प्रवेशाबाबत सतर्कता वाढली आहे.

आता व्हिसा मुलाखतीऐवजी अर्जदारांच्या ऑनलाइन उपस्थितीचं स्कॅनिंग होणार आहे, जे कायदेशीर गुंतागुंत टाळण्यासाठी महत्त्वाचं ठरेल. या बदलांमुळे भारतीयांना अमेरिकेत प्रवासापूर्वी अधिक सावध राहावं लागणार आहे.

हे देखील वाचा –

Ola Uber Mumbai Strike: मुंबईत ओला, उबर चालकांच्या संपाचे कारण काय? जाणून घ्या

Israel attacks Syria: इस्त्रायलने सीरियावर हल्ला का केला? थेट लष्कराला लक्ष्य करण्याचे कारण काय? जाणून घ्या

Maharashtra Code Pink: महाराष्ट्रातील रुग्णालयात लागू करण्यात आलेला ‘कोड पिंक’ काय आहे? जाणून घ्या