US India Tariffs: भारत आणि अमेरिकेमध्ये ताणलेले गेलेले संबंध सुधारणा दिसत आहे. मात्र, अमेरिका सातत्याने भारताने रशियाकडून तेल खरेदी करणे थांबवण्याची मागणी करत आहे. आता रशिया-युक्रेन युद्धातून रशियाला आर्थिक मदत मिळत असल्याचा आरोप करत, अमेरिकेने भारत आणि चीन सारख्या देशांवर टॅरिफ (आयात शुल्क) लावण्याची मागणी G7 देशांकडे केली आहे.
अमेरिकेने भारत आणि चीनला रशियाच्या युद्ध प्रयत्नांना मदत करणारे ‘प्रमुख देश’ म्हटले आहे.
अमेरिकेचे ट्रेझरी सेक्रेटरी स्कॉट बेसेंट आणि व्यापार प्रतिनिधी जेमिसन ग्रीर यांनी G7 देशांच्या अर्थमंत्र्यांसोबत झालेल्या बैठकीत ही मागणी केली. “केवळ एकसंध प्रयत्नांमुळेच पुतिनच्या युद्ध मशीनला आर्थिक मदत थांबवता येईल,” असे ते संयुक्त निवेदनात म्हणाले.
भारतावर आधीच 50% टॅरिफ
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताच्या आयातीवर आधीच अतिरिक्त 25% शुल्क वाढवले आहे, ज्यामुळे एकूण टॅरिफ 50% झाला आहे. एका मुलाखतीत ट्रम्प म्हणाले, “हे करणे सोपे नव्हते, कारण यामुळे भारत आणि अमेरिका यांच्या संबंधांवर परिणाम झाला आहे. रशियाचा सर्वात मोठा ग्राहक भारत होता. ते रशियाकडून तेल खरेदी करत आहेत, म्हणून मी भारतावर 50% टॅरिफ लावला.
हा मोठा निर्णय होता आणि यामुळे भारतासोबत दुरावा निर्माण झाला आहे.”, असेही ते म्हणाले. दुसरीकडे, चीनसोबतचे संबंध चांगले ठेवण्यासाठी ट्रम्प यांनी चीनवर नवीन टॅरिफ लावण्यापासून स्वतःला रोखले आहे.
भारत-अमेरिका संबंधात तणाव
अमेरिकेच्या ट्रेझरी विभागाच्या प्रवक्त्याने जाहीरपणे भारत आणि चीनच्या वस्तूंवर ‘अर्थपूर्ण टॅरिफ’ लावण्याची मागणी केली. रशियाचे स्वस्त तेल खरेदी करून हे दोन्ही देश युद्धाला निधी देत असल्याचा त्यांचा दावा आहे. जोपर्यंत युद्ध संपत नाही, तोपर्यंत हे टॅरिफ लागू राहतील, असेही सांगण्यात आले आहे.
हे देखील वाचा – Navi Mumbai Airport: प्रतीक्षा संपली! ‘या’ तारखेला होणार नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे उद्घाटन