Home / देश-विदेश / Violence again in banglades : बांगलादेशमध्ये पुन्हा हिंसाचार! जाळपोळ! भारतविरोधी निदर्शने! हिंदू तरुणाला जाळले

Violence again in banglades : बांगलादेशमध्ये पुन्हा हिंसाचार! जाळपोळ! भारतविरोधी निदर्शने! हिंदू तरुणाला जाळले

Violence again in banglades – बांगलादेशमधील कट्टरपंथीयांचा नेता शरीफ उस्मान हादी याचा मृत्यू झाल्याचे वृत्त समोर आल्यापासून अनेक शहरांमध्ये हिंसाचार...

By: Team Navakal
Violence again in banglades
Social + WhatsApp CTA
 Violence again in banglades - बांगलादेशमधील कट्टरपंथीयांचा नेता शरीफ उस्मान हादी याचा मृत्यू झाल्याचे वृत्त समोर आल्यापासून अनेक शहरांमध्ये हिंसाचार उफाळून आला आहे. हादीचे हल्लेखोर भारतात पळून गेले असा संशय कट्टरपंथीयांनी व्यक्त केला. त्यातून भारतविरोधी निदर्शने (Violence again in banglades) सुरू झाली. निदर्शकांनी जागोजागी भारताविरोधी नारे दिले. भारतीय दूतावासाच्या कार्यालयांवर हल्ले केले. एका हिंदू युवकाला जिवंत जाळले. दोन वृत्तपत्रांच्या कार्यालयांवर हल्ले करण्यात आले. अनेक ठिकाणी आगी लावल्या. काल गुरुवारी सुरू झालेला हा हिंसाचार आज शुक्रवारीदेखील सुरूच राहिला. परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचे पाहून हंगामी सरकारचे प्रमुख युनूस यांनी लष्कराला पाचारण केले आहे. पुढील वर्षी फेब्रुवारी महिन्यात बांगलादेशात सार्वत्रिक निवडणुका होणार आहेत. त्यामुळे विविध विषय पेटवले जात आहेत.


उस्मान हादी 12 डिसेंबर रोजी निवडणुकीच्या प्रचारासाठी रिक्षातून जात असताना ढाकामध्ये दुचाकीवरून आलेल्या अज्ञात हल्लेखोरांनी अगदी जवळून त्याच्या डोक्यात गोळ्या झाडल्या. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या हादीला एअर अ‍ॅम्ब्युलन्सने सिंगापूरला नेण्यात आले. तिथे उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. त्याच्या मृत्यूचे वृत्त कळताच त्याचे कट्टरपंथी समर्थक झुंडीने रस्त्यावर उतरले. जाळपोळ आणि तोडफोड करत हे निदर्शक भारतीय ठिकाणांना लक्ष्य करत आहेत. दीपचंद दास नामक भारतीय तरुणाला जमावाने जिवंत जाळले.
चट्टोग्राममध्ये निदर्शकांनी भारताच्या सहाय्यक उच्चायुक्ताां बंगल्यावर दगडफेक केली. राजशाही येथे भारतीय दुतावासावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. भारतीय दुतावास बंद करण्याची मागणी केली.

निदर्शकांनी शेख हसीना यांच्या अवामी लीग पार्टीच्या कार्यालयांवरही हल्ले केले. भारताच्या आश्रयाला आलेल्या शेख हसीना यांना आमच्या ताब्यात द्या, अशी मागणी निदर्शक करत होते/. याआधी सन 2024 मध्ये तत्कालीन पंतप्रधान शेख हसीना यांच्या विरोधात जे हिंसक आंदोलन झाले होते त्या आंदोलनाचा उस्मान हादी हा प्रमुख चेहरा होता. तो कट्टर भारतविरोधी आणि हसीनाविरोधी आहे. त्याने अनेकदा भारताच्या विरोधात गरळ ओकली होती. हादी हा इन्कलाब मंचचा प्रवक्ता होता.

आज राष्ट्रीय दुखवटा
बांगलादेशच्या हंगामी सरकारचे प्रमुख युनूस यांनी हादी यांच्या हल्लेखोरांना लवकरात लवकर अटक करून त्यांना कठोर शिक्षा देण्याची ग्वाही देत निदर्शकांना शांतता राखण्याचे आवाहन केले. उद्या शनिवारी हादीच्या निधनानिमित्त एक दिवसाचा दुखवटा जाहीर केला.

कोण होता उस्मान हादी?

उस्मान हादी हा ढाका विद्यापीठाचा माजी विद्यार्थी होता. महाविद्यालयापासूनच तो विद्यार्थी चळवळीत सहभागी होता. कट्टरपंथी विचारांचा हादी 2024 मध्ये तत्कालीन पंतप्रधान शेख हसीना यांच्याविरोधात झालेल्या विद्यार्थी आंदोलनाचा चेहरा बनला होता. इकबाल मंच या संघटनेचा तो प्रवक्ता आणि प्रमुख नेता होता. त्यांनी काही दिवसांपूर्वी ग्रेटर बांगलादेशचा एक नकाशा सोशल मीडियावर शेअर केला होता. या नकाशामध्ये भारताचा काही ईशान्येकडील भूभाग बांगलादेशचा भाग म्हणून दाखवण्यात आला होता. त्यावरून भारतात आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर तीव्र संताप व्यक्त करण्यात आला होता. पुढील वर्षी बांगलादेशात होणारी सार्वत्रिक निवडणूक हादी लढवणार होता.

—————————————————————————————————————————————————

हे देखील वाचा –

ताजमहालचा पिवळा संगमरवर पुनर्जीवित करण्यासाठी नॅनो तंत्र

 पंढरपुरात विठ्ठल मूर्तीच्या चरणांची झीज; वज्रलेपाबाबत निर्णय कधी?

Web Title:
For more updates: , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या