कॉम्प्युटरवर व्हॉट्सॲपचा वापर करता? त्वरित करा ‘हे’ काम, अन्यथा होईल मोठे नुकसान; सरकारने दिला इशारा

Security Alert for WhatsApp Users

Security Alert for WhatsApp Users | कॉम्प्युटरवर व्हॉट्सॲप (WhatsApp Desktop) वापरणाऱ्यांसाठी भारत सरकारने गंभीर सुरक्षेचा इशारा (security alert) जारी केला आहे. इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाच्या (Ministry of Electronics and IT) अंतर्गत कार्यरत इंडियन कॉम्प्युटर इमर्जन्सी रिस्पॉन्स टीमने (CERT-In Alert) जारी केलेल्या चेतावणीत यूजर्सला तातडीने ॲप अपडेट करण्यास सांगितले आहे.

CERT-In च्या माहितीनुसार, व्हॉट्सॲप डेस्कटॉपच्या 2.2450.6 पूर्वीच्या व्हर्जनमध्ये (WhatsApp Desktop versions) एक मोठी त्रुटी आढळून आली आहे. या त्रुटीमुळे MIME प्रकार (MIME type vulnerability) आणि फाईल एक्स्टेंशनची चुकीची मांडणी होते, ज्यामुळे धोकादायक अटॅचमेंट योग्यरीत्या ओळखल्या जात नाहीत. हाच मुद्दा हॅकर्सना (hackers) फायदा करून देऊ शकतो.

हॅकर्स या तांत्रिक त्रुटीचा उपयोग करून स्पूफिंग एक्सप्लॉइट (Spoofing Exploit) तयार करू शकतात. यूजर्सने हे अटॅचमेंट उघडल्यास, त्याच्या संगणकावर अनियंत्रित कोड कार्यान्वित होऊ शकतो आणि त्याचे संपूर्ण नियंत्रण हॅकरकडे जाऊ शकते. यामुळे व्यक्तिगत माहिती, फाईल्स आणि संवेदनशील डेटाचोरीला जाऊ शकतो.

भारतात सध्या 400 मिलियनहून अधिक व्हॉट्सॲप यूजर्स (WhatsApp users in India) असून, यातील अनेकजण डेस्कटॉपवर व्हॉट्सॲपचा वापर करतात. त्यामुळे ही असुरक्षा अधिकच गंभीर बनते.

CERT-In ने दिलेल्या सूचना:

  • व्हॉट्सॲप डेस्कटॉप अ‍ॅप (WhatsApp Desktop app) त्वरित अपडेट करा.
  • मायक्रोसॉफ्ट स्टोअर (Microsoft Store) उघडा.
  • “WhatsApp Messenger” शोधा.
  • ‘Update’ बटणावर क्लिक करा.

व्हॉट्सॲपने (WhatsApp) देखील ही तांत्रिक त्रुटी मान्य करत एक सुरक्षा सल्ला (security advisory) जारी केला असून, वापरकर्त्यांनी नविन वापरण्याची वापरण्याची शिफारस केली आहे.

याच महिन्यात CERT-In ने iPhone 16 (iPhone 16 alert) आणि Android 15 (Android 15 warning) वापरणाऱ्यांसाठी देखील सुरक्षेच्या सूचना (security guidelines) जारी केल्या होत्या. डिजिटल सुरक्षेबाबत नागरिकांनी सतर्क राहण्याचे आणि आपली डिव्हाइसेस नियमितपणे अपडेट करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.