Nishikant Dubey: ‘पंतप्रधान मोदींशिवाय भाजपला 150 जागाही मिळणार नाहीत’, ‘या’ खासदाराने केले मोठे विधान

Nishikant Dubey on PM Modi

Nishikant Dubey on PM Modi | भाजपचे (BJP) खासदार निशिकांत दुबे (Nishikant Dubey) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या नेतृत्वाचे पक्षाच्या यशात असलेले अत्यंत महत्त्वाचे स्थान अधोरेखित केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाशिवाय भाजप लोकसभा निवडणुकीत 150 जागाही जिंकू शकणार नाही, असा दावा केला आहे.

दुबे म्हणाले, “आज नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान झाले आहेत. पण जर उद्या मोदींना पक्षात नसतील, तर भाजप फारतर 150 जागा जिंकेल. पक्षासाठी मोदींचे नेतृत्व हे केवळ गरजच नाही, तर ती भाजपची मजबुरी आहे.”, त्यांच्या या वक्तव्याची आता राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे.

त्यांनी स्पष्टपणे सांगितले की, मोदींनी गरिबांमध्ये जे विश्वास निर्माण केला आहे, त्यामुळे पूर्वी भाजपपासून दूर असणारा मतदार वर्ग आता पक्षाच्या बाजूने वळला आहे. “काहींना आवडो वा न आवडो, हीच वस्तुस्थिती आहे. मोदींशिवाय भाजपचे यश अशक्य आहे,” असे ते म्हणाले. ते ANI या वृत्तसंस्थेला दिलेला मुलाखतीत बोलत होते.

2029 च्या निवडणुकीतही मोदींचे नेतृत्व अनिवार्य

चार वेळा गोड्डा मतदारसंघातून निवडून आलेले खासदार दुबे म्हणाले, “2029 ची निवडणूक भाजप मोदींच्याच नेतृत्वाखाली लढवेल, ही पक्षाची गरज आहे. एक कार्यकर्ता म्हणून मी सांगतो, आम्हाला मोदीजी हवेत.”

त्यांनी पुढे स्पष्ट केले की, “हे वादग्रस्त नाही, तर जमिनीवरचे सत्य आहे. मोदींचे नाव स्वतः मतं मिळवून देऊ शकते, कारण जनतेचा त्यांच्या नेतृत्वावर ठाम विश्वास आहे. आम्ही 2047 पर्यंत विकसित भारताचे स्वप्न पाहतो आणि त्यासाठी मोदींचे नेतृत्वच हवे.”

मोहन भागवतांच्या वक्तव्यावरही प्रतिक्रिया

RSS प्रमुख मोहन भागवत यांनी वयाच्या 75 व्या वर्षी पद सोडण्याबाबत केलेल्या वक्तव्यावर भाष्य करताना दुबे म्हणाले, “मोदींना अशी गरज नाही. भाजपला त्यांची आवश्यकता आहे. कोणाला मान्य असो वा नसो, आजही अनेक पक्ष ‘नेतृत्व पूजक’ प्रणालीवर चालतात.” दुबे यांनी स्पष्ट सांगितले की, “पुढील 15–20 वर्ष नरेंद्र मोदी हेच देशाचे नेते असतील. तेच भारताला दिशा देतील.”

ते पुढे म्हणाले, “मी 2009 मध्ये पहिल्यांदा निवडणूक जिंकलो, तेव्हाचे माझे मताधिक्य फक्त 6,000 होते. म्हणजेच भाजपची परिस्थिती किती कठीण होती, हे लक्षात घ्या. पण आज, मोदींच्या नावावर देशभरात लाट आहे.”

हे देखील वाचा –

मेटाकडून भाषांतरात मोठी चूक, थेट मुख्यमंत्र्यांनाच मृत घोषित केले; आता मागितली माफी

Air India Plane Crash: टाटा समूहाकडून एअर इंडिया AI-171 अपघातग्रस्तांसाठी ट्रस्ट स्थापन, 500 कोटींची करणार मदत

Airtel ग्राहकांना ‘Perplexity Pro’ मोफत! 17,000 रुपये किमतीची AI सबस्क्रिप्शन एका वर्षासाठी फ्री; कसे मिळवाल?