महाबळेश्वर- शहरातील एस. टी.स्थानकासमोर (S.T.Station) असलेल्या एका हॉटेलमध्ये (Hotel) शिकाऊ कामगार असलेल्या एका १९ वर्षीय तरुणीने आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली. रागिणी सिनील साव (१९ ) असे आत्महत्या केलेल्या तरुणीचे नाव असून ती मूळची बिहार राज्यातील मुशीमरी येथे राहणारी होती.
नागपूर येथील प्रथम इन्स्टिट्यूट (Pratham Institute) येथून प्रशिक्षण घेऊन चार परप्रांतीय तरुणी महाबळेश्वरच्या (Mahabaleshwar) या हॉटेलमध्ये शिकाऊ कामगार म्हणून आल्या होत्या. यामध्ये रागिणीही होती.रागिणी ही आपल्या मैत्रिणींसमवेत हॉटेलच्याच कर्मचार्यांसाठी असलेल्या खोलीत राहत होती.तिच्या इतर मैत्रिणी रात्री आपले काम संपवून पुन्हा खोलीच्या दिशेने आल्या. एक तास दरवाजा ठोठावूनदेखील आतून प्रतिसाद न मिळाल्याने त्यांना संशय आला. याबाबतची माहिती त्यांनी हॉटेल व्यवस्थापकाला दिली. त्यांनी दरवाजा तोडून खोलीत प्रवेश केला. यावेळी स्वच्छतागृह आतून बंद असल्याचे दिसले. त्यामुळे दरवाजा उघडून पाहिले असता रागिणी गळफास लावलेल्या स्थितीत आढळून आली. त्यानंतर पोलीस तत्काळ घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी रागिणीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला. तिने आत्महत्या का केली, याचे कारण मात्र अद्याप उघड झालेले नाही.