भारताच्या भूमिकेला यश! जागतिक बँकेचा मोठा निर्णय, पाकिस्तानला दक्षिण आशिया ग्रुपमधून काढले बाहेर

World Bank Removes Pakistan From South Asia Region

World Bank Removes Pakistan From South Asia Region | जागतिक बँकेने (World Bank) पाकिस्तान (Pakistan) आणि अफगाणिस्तानला (Afghanistan) आता दक्षिण आशिया प्रशासकीय विभागातून बाहेर काढले आहे.

रिपोर्टनुसार, भारताने बहुराष्ट्रीय बँकेला दहशतवादाला खतपाणी घालणाऱ्या पाकिस्तानला कर्ज देणे थांबवण्याबद्दल दबाव आणल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे.

, आता पाकिस्तान आणि अफगाणिस्तानचा समावेश बँकेच्या ‘मिडल ईस्ट आणि उत्तर आफ्रिका’ (Middle East and North Africa) प्रदेशात करण्यात आला आहे. यामुळे आता दक्षिण आशिया ग्रुपमध्ये फक्त भारत (India), बांगलादेश (Bangladesh), भूतान (Bhutan), मालदीव (Maldives), नेपाळ (Nepal) आणि श्रीलंका (Sri Lanka) हे 6 देश उरले आहेत .

जागतिक बँकेच्या प्रवक्त्याने या बदलावर स्पष्टीकरण देताना सांगितले की, ही व्यवस्था केवळ व्यवस्थापकीय देखरेखीसाठी केली गेली आहे. ‘इंटरनॅशनल बँक फॉर रिकन्स्ट्रक्शन अँड डेव्हलपमेंट’ (IBRD) आणि ‘इंटरनॅशनल डेव्हलपमेंट असोसिएशन’ (IDA) या दोन संस्थांच्या कामामध्ये सुसंवाद साधण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. आंतरराष्ट्रीय वित्त महामंडळ (IFC) आणि आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (IMF) यांसारख्या इतर संस्थांमध्येही अशीच रचना वापरली जाते, ज्यामुळे प्रशासकीय कार्य अधिक सोपे होते.

भारताचा पाकिस्तानला कर्ज देण्याला तीव्र विरोध

या निर्णयाला भारताच्या भूमिकेशी जोडून पाहिले जात आहे. भारताने आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (IMF) आणि आशियाई विकास बँक (ADB) यांसारख्या बहुपक्षीय संस्थांनी पाकिस्तानला दिलेल्या कर्जावर अनेकदा आक्षेप घेतला आहे. भारताच्या मते, पाकिस्तान या कर्जाचा वापर शस्त्र खरेदीसाठी करत आहे आणि आर्थिक मदतीचा दुरुपयोग करत आहे.

भारताने मागणी केली आहे की, पाकिस्तानला पुन्हा ‘फायनान्शिअल ॲक्शन टास्क फोर्स’ (FATF) च्या ‘ग्रे लिस्ट’मध्ये टाकले जावे. FATF ही दहशतवादी वित्तपुरवठा (terror financing) आणि मनी लाँड्रिंगविरोधात (money laundering) काम करणारी एक जागतिक संस्था आहे.

या संदर्भात, जागतिक बँकेने नवीन व्हॉईस प्रेसिडेंटचीनियुक्ती केली आहे. डच नागरिक जोहान्स झुट्ट हे 1 जुलै 2025 पासून दक्षिण आशिया क्षेत्राचे नवे प्रमुख म्हणून पदभार स्वीकारतील आणि त्यांचे मुख्य कार्यालय भारतात असेल. झुट्ट सध्या ब्राझीलमध्ये कंट्री डायरेक्टर आहेत. ते आता भारत, बांगलादेश, भूतान, मालदीव, नेपाळ आणि श्रीलंका या देशांमधील 39 अब्ज डॉलर्सच्या (USD 39 billion) प्रकल्पांची देखरेख करतील.

जागतिक बँकेच्या प्रवक्त्याने दिलेल्या माहितीनुसार, त्यांचे नवीन कार्यालय दिल्लीत असेल, जे दक्षिण आशिया क्षेत्रासाठी नवे प्रादेशिक केंद्र म्हणून काम करेल.