बचत खातेदारांसाठी वाईट बातमी! भारतातील सर्वात मोठ्या खासगी बँकेने व्याजदराबाबत घेतला ‘हा’ निर्णय

HDFC Bank Interest Rate

HDFC Bank Interest Rate | एचडीएफसी बँकेने (HDFC Bank) आपल्या बचत खात्यावरील व्याजदरात (Savings Account Interest Rate) 25 बेसिस पॉइंट्सची कपात केली आहे. हा नवीन दर 12 एप्रिलपासून लागू झाला असून, आता 50 लाख रुपयांपेक्षा कमी शिल्लक असलेल्या खात्यांना केवळ 2.75% वार्षिक व्याज मिळणार आहे.

खासगी क्षेत्रातील (Private Bank Interest Rate) बँकांमध्ये हा सर्वात कमी व्याजदर आहे. तसेच, 50 लाखांपेक्षा जास्त शिल्लक असलेल्या खात्यांवरील व्याजदर 3.50% वरून 3.25% करण्यात आला आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) अलीकडे रेपो दरात (Repo Rate Cut) कपात केल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे.

दरम्यान, ICICI Bank आणि Axis Bank या बँका सध्या 50 लाखांपेक्षा कमी शिल्लक असलेल्या खात्यांवर किमान 3% व्याज देत आहेत.

बचत खात्यावरील व्याज कसे मोजले जाते?

RBI च्या नियमांनुसार, बचत खात्यावरील व्याज दररोजच्या अंतिम शिल्लक रकमेवर आधारित असते.

सूत्र – व्याज = दररोजची शिल्लक × वार्षिक व्याजदर × दिवसांची संख्या / 365

उदाहरण: तुमच्या खात्यात जर 50,000 रुपये शिल्लक असतील आणि व्याजदर 3% असेल, तर एका दिवसाचे व्याज होईल:

50,000 × 3/100 × 1/365 = ₹4.11

जर तीच रक्कम 30 दिवस कायम ठेवली, तर व्याज = ₹123.29

NRO किंवा RFC खात्यांवर TDS लागू होतो.

इतर बँकांची स्थिती

एचडीएफसी बँकेने याआधी 1 एप्रिलपासून काही मुदत ठेवींवरील व्याजदर (Fixed Deposit Rates) देखील 25-40 बेसिस पॉइंट्सने कमी केले होते.

कॅनरा बँकेने (Canara Bank) 3 कोटी रुपयांपेक्षा कमी ठेवींसाठी व्याजदरात 20 बेसिस पॉइंट्सची कपात केली आहे. सुधारित दर 10 एप्रिलपासून लागू झाले आहेत. बँकेकडून आता सामान्य ग्राहकांना 4% ते 7.25% आणि ज्येष्ठ नागरिकांना 4% ते 7.75% दरम्यान व्याज दिले जात आहे.

बँक ऑफ बडोदाने (Bank of Baroda) 7 एप्रिलपासून ‘Square Drive Deposit Scheme’ नावाची नवीन योजना सुरू केली आहे, जी 3 कोटी रुपयांपेक्षा कमी ठेवींसाठी आहे. त्याचबरोबर, ‘Utsav Deposit Scheme’ बंद करण्यात आली आहे.