ITR भरण्याची मुदत पुन्हा वाढणार? जाणून घ्या महत्त्वाची माहिती

ITR Deadline

ITR Deadline | आयकर रिटर्न (ITR) भरण्याची धावपळ सुरू असताना मूल्यांकन वर्ष 2025-26 साठी ITR-2, ITR-3, ITR-5, ITR-6 आणि ITR-7 हे महत्त्वाचे फॉर्म्स अजून उपलब्ध नसल्याने करदाते आणि कर सल्लागार चिंतेत आहेत.

केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने (CBDT) रिटर्न भरण्याची मुदत 31 जुलै 2025 पासून 15 सप्टेंबर 2025 पर्यंत वाढवली असली, तरी फॉर्म्स उपलब्ध न झाल्यास आणखी मुदतवाढीची गरज भासू शकते, असे तज्ज्ञांचे मत आहे.

मुदतवाढीचा निर्णय

मे महिन्यात CBDT ने करदात्यांना दिलासा देत रिटर्न भरण्याची मुदत 15 सप्टेंबर 2025 पर्यंत वाढवली होती. त्यांच्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, नवीन आयटीआर फॉर्म्समधील व्यापक बदल आणि प्रणाली तयारीसाठी वेळ लागत असल्याने हा निर्णय घेण्यात आला. या बदलांमुळे अनुपालन सोपे होईल आणि करदात्यांना अचूक रिटर्न भरण्यास मदत होईल, असे मंडळाने नमूद केले.

AY 2021-22 आणि AY 2022-23 साठी अद्ययावत रिटर्न युटिलिटीज आणि वित्त कायदा 2025 मधील बदलांचा समावेश असलेले फॉर्म्स उपलब्ध नाहीत, त्यामुळे मोठी समस्या निर्माण झाले. शिवाय, टॅक्स ऑडिटसाठी लागणारे 3CA/3CB-3CD फॉर्म्सही अजून जारी झालेले नाहीत, ज्यामुळे कर व्यावसायिकांना वेळेत काम पूर्ण करणे कठीण झाले आहे.

तज्ज्ञांची मागणी

कर तज्ज्ञांनी सरकारकडे आणखी मुदतवाढ मागितली आहे. फाइलिंग हंगाम सुरू झालेले 100 हून अधिक दिवस झाले तरी फॉर्म्स नसल्याने करदात्यांना त्रास होतोय. त्यांनी नॉन-ऑडिट प्रकरणांसाठी 30 सप्टेंबर 2025 आणि ऑडिट प्रकरणांसाठी 30 नोव्हेंबर 2025 पर्यंत मुदत वाढवण्याची मागणी केली जात आहे. आत्तापर्यंत प्राप्तिकर विभागाने आणखी मुदतवाढीची घोषणा केलेली नाही.

हे देखील वाचा –

Rajya Sabha Nominees: राष्ट्रपतींकडून राज्यसभेवर 4 जणांची नियुक्ती, उज्ज्वल निकम यांच्यासह या’ 3 जणांचा समावेश

CJI Gavai: ‘न्यायव्यवस्थेत सुधारणा करण्याची गरज’, सरन्यायाधीश गवई यांचे मोठे विधान, प्रदीर्घ खटल्यांवर व्यक्त केली चिंता