ITR Filing | आयकर विभागाने (Income Tax Department) मूल्यांकन वर्ष 2025-26 साठी आयकर रिटर्न (Income Tax Return ) भरण्याची अंतिम मुदत वाढली आहे. आयकर विभागाने आता आयटीआर भरण्याची अंतिम तारीख 31 जुलैऐवजी 15 सप्टेंबरपर्यंत वाढवली आहे. आयकर रिटर्न (ITR) फॉर्मची अधिसूचना जारी होण्यास विलंब झाल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे.
ज्या करदात्यांना त्यांच्या खात्यांचे ऑडिट करण्याची आवश्यकता नाही, त्यांच्यासाठी आयकर रिटर्न भरण्याची अंतिम मुदत पूर्वी 31 जुलै होती. मात्र, सध्याच्या ITR फॉर्ममधील बदलांमुळे आणि त्या बदलांनुसार प्रणालीमध्ये सुधारणा करावी लागल्यामुळे ही मुदत वाढवण्यात आली आहे.
CBDT चे स्पष्टीकरण
केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने (Central Board of Direct Taxes) माहिती दिली की, “करदात्यांसाठी आयकर रिटर्न भरण्याचा अनुभव अधिक सुलभ आणि सोयीस्कर करण्यासाठी, मूळ अंतिम मुदत 31 जुलैऐवजी आता 15 सप्टेंबर 2025 करण्यात आली आहे.”
Kind Attention Taxpayers!
— Income Tax India (@IncomeTaxIndia) May 27, 2025
CBDT has decided to extend the due date of filing of ITRs, which are due for filing by 31st July 2025, to 15th September 2025
This extension will provide more time due to significant revisions in ITR forms, system development needs, and TDS credit… pic.twitter.com/MggvjvEiOP
CBDT ने सांगितले की, AY 2025-26 साठी अधिसूचित ITR फॉर्ममध्ये अनुपालन सुलभ करणे, पारदर्शकता वाढवणे आणि अचूकता सुनिश्चित करणे या उद्देशाने महत्त्वाचे बदल करण्यात आले आहेत. या बदलांमुळे संबंधित युटिलिटीजच्या सिस्टम डेव्हलपमेंट, इंटिग्रेशन आणि टेस्टिंगसाठी अतिरिक्त वेळ आवश्यक आहे.
CBDT च्या निवेदनात नमूद केले आहे की, “31 मे 2025 पर्यंत भरल्या जाणाऱ्या TDS स्टेटमेंट्समधून मिळणारे क्रेडिट्स जूनच्या सुरुवातीपासून दिसू लागतील, ज्यामुळे रिटर्न भरण्यासाठी उपयुक्त कालावधी खूपच कमी होईल.”