PM Kisan Yojana: लवकरच प्रतिक्षा संपणार! 9.7 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात ‘या’ तारखेला जमा होणार 2,000 रुपये

PM Kisan 20th Installment

PM Kisan 20th Installment: प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या 20 व्या हप्त्याची (PM Kisan 20th Installment) प्रतीक्षा करणाऱ्या कोट्यवधी शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. या योजनेचा (PM Kisan Yojana) पुढील हप्ता लवकरच बँक खात्यात जमा होणार आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी 2 ऑगस्ट 2025 रोजी उत्तर प्रदेशातील वाराणसी येथून एक कार्यक्रमाद्वारे पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात थेट 2हजार रुपये जमा करणार आहेत.

या योजनेअंतर्गत सुमारे 9.7 कोटी पात्र शेतकऱ्यांना याचा लाभ मिळणार असून, शेतकऱ्यांच्या खात्यात थेट लाभांतर पद्धतीने पैसे जमा केले जाणार आहेत. पीएम किसानच्या अधिकृत खात्याने ‘एक्स’ या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पोस्ट करत ही माहिती दिली आहे.

पोस्टमध्ये नमूद करण्यात आले आहे की, “आता आणखी प्रतीक्षा नाही! पीएम किसान योजनेचा 20 वा हप्ता 2 ऑगस्ट रोजी थेट तुमच्या खात्यात जमा होईल.”

यापूर्वी योजनेचा 19 वा हप्ता फेब्रुवारी महिन्यात वितरित करण्यात आला होता. त्यानंतर 20 व्या हप्त्यासाठी पात्र शेतकऱ्यांमध्ये उत्सुकता होती. आता अधिकृतपणे तारीख निश्चित झाल्याने या निर्णयाने शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

ई-केवायसी अनिवार्य

योजना अंतर्गत लाभ सुरू ठेवण्यासाठी शेतकऱ्यांनी ई-केवायसी, आधार पडताळणी पूर्ण करणे अत्यावश्यक आहे. कृषी मंत्रालयाने स्पष्ट केले आहे की, ही निकष पूर्ण न करणाऱ्या शेतकऱ्यांचा हप्ता थांबवण्यात आला आहे.

योजना पुन्हा सुरू करण्यासाठी संबंधित शेतकऱ्यांनी लवकरात लवकर ही आवश्यक प्रक्रिया पूर्ण करावी, असे आवाहन करण्यात आले आहे. एकदा आवश्यक अटी पूर्ण झाल्यानंतर त्यांना थांबलेले हप्तेही मिळू शकतात. या आर्थिक मदतीमुळे शेतकऱ्यांच्या शेतीशी संबंधित विविध गरजांसाठी निधी उपलब्ध होणार आहे.

Share:

More Posts