UPI New Rules: नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) 1 ऑगस्ट 2025 पासून युपीआय ॲप्स गुगल पे, पेटीएम आणि फोन पे यांच्या कार्यपद्धतीत महत्त्वाचे बदल (UPI New Rules) करणार आहे. जे ग्राहक दिवसातून अनेकदा याचा वापर करतात, त्यांच्यासाठी हे नियम विशेष महत्त्वाचे ठरतील.
हे बदल शिल्लक तपासणी, ऑटोपे व्यवहार आणि जोडलेल्या खात्यांच्या पडताळणीसाठी आहेत. तुम्ही देखील यूपीआय ॲप्सचा नियमित वापर करत असाल तर या नियमांविषयी जाणून घ्यायला हवे.
शिल्लक तपासणीवर मर्यादा
आता प्रत्येक ॲपमधून दिवसातून फक्त 50 वेळा बँक खात्यातील शिल्लक तपासू शकतील. व्यस्त वेळेत व्यवहारांवर येणारा ताण कमी करण्यासाठी ही मर्यादा ठेवण्यात आली आहे. तसेच, प्रत्येक व्यवहारानंतर बँकांना शिल्लक रक्कम दाखवणे बंधनकारक असेल.
ऑटोपे व्यवस्थापन
ईएमआय, एसआयपी किंवा सबस्क्रिप्शनसारखे नियमित पेमेंट आता ठराविक वेळेतच होतील. सकाळी 10 पूर्वी, दुपारी 1 ते 5 आणि रात्री 9:30 नंतर हे व्यवहार पूर्ण होतील. व्यस्त वेळेत, म्हणजे सकाळी 10 ते दुपारी 3 आणि सायंकाळी 5 ते रात्री 9:30 दरम्यान ऑटोपे टाळण्यासाठी हे बदल करण्यात आले. प्रयत्नांची मर्यादा संपल्यानंतर ऑटोपे कापले जाणार नाही.
खाते माहितीची मर्यादा
पुढील महिन्यापासून मोबाईल नंबरशी जोडलेली माहिती दिवसातून फक्त 25 वेळा पाहता येईल. ही यादी फक्त ॲपमध्ये बँक निवडल्यानंतरच उपलब्ध असेल.
व्यवहार स्थिती आणि नाव
व्यस्त वेळेत व्यवहार अडचणीत आल्यास आता ‘प्रलंबित’ ऐवजी काही सेकंदात खरी स्थिती दाखवली जाईल. स्थिती तपासण्यासाठी फक्त 3 संधी मिळतील, प्रत्येकी 90 सेकंद प्रतीक्षा करावी लागेल. पैसे पाठवताना प्राप्तकर्त्याचे नोंदणीकृत नावही दिसेल. हे बदल जरी मोठे नसले तरी ऑनलाइन पेमेंटची कार्यक्षमता वाढवण्यासाठी केले जात आहेत.