RCB vs PBKS IPL 2025 Final | पंजाब किंग्सने (Punjab Kings) अहमदाबादमध्ये झालेल्या क्वालिफायर 2 मध्ये मुंबई इंडियन्सला (Mumbai Indians) पराभूत करत फायनल गाठली आहे. आता फायनलमध्ये पंजाबचा सामना रॉयल चॅलेंजर्स बेंगळूरुविरुद्ध (Royal Challengers Bengaluru ) होणार आहे. या दोन्ही संघांनी यापूर्वी आयपीएलचे विजेतेपद पटकावलेले नाही. 2016 नंतर पहिल्यांदाच आयपीएलला (IPL) नवा विजेता मिळणार आहे.
आरसीबी चौथ्यांदा आयपीएलच्या अंतिम फेरीत खेळणार आहे. यापूर्वी 2009 मध्ये डेक्कन चार्जर्स, 2011 मध्ये चेन्नई सुपर किंग्स आणि 2016 मध्ये सनरायझर्स हैदराबादकडून त्यांना अंतिम सामन्यात पराभव स्विकारावा लागला होता.
पंजाब किंग्सने यापूर्वी केवळ एकदाच, 2014 मध्ये आयपीएलची अंतिम फेरी गाठली होती. त्यावेळी ते किंग्स इलेव्हन पंजाब म्हणून ओळखले जात होते आणि त्यांना कोलकाता नाईट रायडर्सकडून पराभव पत्करावा लागला होता. 2011 मध्ये प्लेऑफची संकल्पना सुरू झाल्यापासून पंजाब किंग्सने केवळ 2014 मध्येच प्लेऑफमध्ये प्रवेश केला होता.
कर्णधार श्रेयस अय्यर हे 3 वेगवेगळ्या संघांना आयपीएलच्या अंतिम फेरीत पोहोचवणारे पहिला खेळाडू ठरला आहे. यापूर्वी 2020 मध्ये ते दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार होता आणि 2024 मध्ये त्केयाने केआरला विजेतेपद मिळवून दिले होते.
याआधी पंजाब किंग्सने बेंगळूरुमध्ये आरसीबीला हरवले होते, तर आरसीबीने मुल्लानपूरमध्ये झालेल्या सामन्यात पंजाबवर विजय मिळवला होता. मुल्लानपूरमध्ये झालेल्या क्वालिफायर 1 मध्ये या दोन्ही संघांची लढत झाली होती, ज्यात आरसीबीने पंजाब किंग्सला 101 धावांवर ऑलआऊट केले आणि 10 षटके शिल्लक ठेवून विजय मिळवत अंतिम फेरीत प्रवेश निश्चित केला होता.
आयपीएल 2025 चा अंतिम सामना कधी खेळवला जाईल?
आयपीएल 2025 चा अंतिम सामना मंगळवारी, 3 जून रोजी खेळवला जाईल. रॉयल चॅलेंजर्स बेंगळूरु आणि पंजाब किंग्स यांच्यात आयपीएल 2025 चा अंतिम सामना रंगणार आहे.
आरसीबी आणि पंजाब किंग्स यांच्यातील अंतिम सामना कोणत्या ठिकाणी खेळवला जाईल?
अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर आरसीबी आणि पंजाब किंग्स यांच्यातील अंतिम सामना खेळवला जाईल.
भारतात अंतिम सामन्याचे थेट प्रक्षेपण कुठे उपलब्ध असेल?
भारतात आयपीएल 2025 च्या अंतिम सामन्याचे थेट प्रक्षेपण स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर उपलब्ध असेल. आयपीएल 2025 च्या अंतिम सामन्याचे लाईव्ह स्ट्रीमिंग भारतात जिओ हॉटस्टार ॲप आणि वेबसाइटवर उपलब्ध असेल.