Abhishek Sharma’s Mysterious Note | इंडियन प्रीमियर लीग 2025 (IPL 2025) च्या शनिवारी (12 एप्रिल) झालेल्या सामन्यात सनरायझर्स हैदराबाद (SRH) संघाने पंजाब किंग्स (PBKS) विरुद्ध 246 धावांच्या लक्ष्याचा यशस्वी पाठलाग केला. सलामीवीर अभिषेक शर्माने (Abhishek Sharma)याने केवळ 40 चेंडूत शतकी खेळी करत सामन्याचे चित्रच बदलले.
वादळी शतक झळकवल्यानंतर अभिषेकने प्रेक्षकांकडे पाहून एक चिठ्ठी दाखवली. काही क्षणांतच ही चिठ्ठी चर्चेचा विषय ठरली. या चिठ्ठीवर “This one is for Orange Army” असे लिहिले होते.
आयपीएल सुरू झाल्यापासूनच हैदराबादच्या संघाकडून चाहत्यांना मोठी अपेक्षा होती. पण संघाला मोठी धावसंख्या उभारण्यात यश येत नव्हते. तसेच, अभिषेक देखील याआधीच्या सामन्यात फारशी चमकदार कामगिरी करू शकला नव्हता. त्यामुळे पंजाबविरुद्ध शतक झळकवताच त्याने खास चिठ्ठी दाखवत ही खेळी संघाच्या चाहत्यांना अर्पण केली.
"THIS ONE IS FOR ORANGE ARMY".
— Johns. (@CricCrazyJohns) April 12, 2025
– The message from Abhishek Sharma ❤️ pic.twitter.com/2tBNSsKybF
या सामन्यात अभिषेकने 55 चेंडूत 141 धावांची खेळी केली. यात 14 चौकार आणि 10 षटकारांचा समावेश होता.
पंजाब किंग्सकडून 245 धावांचा डोंगर
दरम्यान, सामन्यापूर्वी नाणेफेक जिंकून कर्णधार श्रेयस अय्यरने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियम (Rajiv Gandhi Stadium) येथे प्रभसिमरन सिंग आणि प्रियांश आर्य या जोडीने डावाची धडाकेबाज सुरुवात केली.
पहिल्याच षटकात मोहम्मद शमी (Mohammed Shami) विरुद्ध प्रभसिमरनने तीन चौकार मारले. 3 षटकांतच संघाच्या धावसंख्या 53/0 वर पोहोचली. या सामन्यात अय्यरने 36 चेंडूत 82 धावांची खेळी केली. पंजाबने 20 ओव्हरमध्ये 6 विकेट्स गमावत 245 धावांचा डोंगर उभारला.
SRH च्या विजयात अभिषेक शर्मा ठरला नायक
पंजाबने उभारलेल्या 245 धावांच्या विशाल लक्ष्यासमोर SRH चे फलंदाज एकदम आत्मविश्वासाने मैदानात उतरले. अभिषेक शर्माने सुरुवातीपासून आक्रमक फलंदाजी करताना केवळ 40 चेंडूत शतक पूर्ण केले. त्याच्या या ऐतिहासिक खेळीमुळे SRH ने 246 धावांचे लक्ष्य 19.1 षटकांत पूर्ण करत विजय मिळवला.