Home / क्रीडा / केएल राहुल झाला बाबा, अथिया शेट्टीने दिला गोंडस बाळाला जन्म; सोशल मीडियाद्वारे दिली गुड न्यूज

केएल राहुल झाला बाबा, अथिया शेट्टीने दिला गोंडस बाळाला जन्म; सोशल मीडियाद्वारे दिली गुड न्यूज

Athiya Shetty – KL Rahul Blessed with Baby Girl | भारतीय क्रिकेटपटू के. एल. राहुल (KL Rahul) आणि अभिनेत्री अथिया शेट्टी (Athiya Shetty) यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांच्या चाहत्यांना आनंदाची बातमी दिली आहे. त्यांच्या घरी चिमुकल्या परीचे आगमन झाले आहे. अथियाने गोंडस बाळाला जन्म दिला आहे.

केएल राहुल (KL Rahul) व अथियाने सोशल मीडियाच्या माध्यमातून ही आनंदाची बातमी दिल्यानंतर आता त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. चाहते व अनेक कलाकार, खेळाडू त्यांचे अभिनंदन करत आहेत.शनाया कपूर, कृष्णा श्रॉफ, परिणीती चोप्रा, कियारा अडवाणी, कृती सेनॉन आणि मसाबा गुप्ता यासारख्या प्रसिद्ध व्यक्तींनी त्यांचे अभिनंदन केले.

राहुलने आयपीएल 2025 मधील दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध लखनऊ सुपर जायंट्स या सामन्यातून माघार घेतली होती. त्यावेळी सामन्यातून माघार घेण्याचे कारण सांगण्यात आले नव्हते. मात्र, आता मुलीच्या जन्मासाठी तो घरी परतल्याचे स्पष्ट झाला.

दरम्यान, राहुल आणि अथिया यांनी 23 जानेवारी 2023 रोजी खंडाळ्यातील फार्महाऊसवर आपल्या जवळच्या लोकांच्या उपस्थितीत लग्न केले होते. अथिया ही अभिनेता सुनील शेट्टीची लेक आहे. दोघांनी नोव्हेंबर 2024 मध्ये लवकरच आई-वडील होणार असल्याची आनंदाची बातमी चाहत्यांसोबत शेअर केली होती. आता, दोन वर्षांच्या वैवाहिक जीवनानंतर त्यांच्या कुटुंबात नव्या पाहुणीचे आगमन झाले आहे.