Commonwealth Games 2030: पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत 2030 च्या कॉमनवेल्थ गेम्ससाठी (Commonwealth Games 2030) बोली लावण्याच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली आहे. भारताला स्पर्धेचे यजमानपद मिळाल्यास या स्पर्धा अहमदाबादमध्ये पार पडतील.
युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालयाने याबाबतची माहिती दिली आहे. यजमानपदासाठी बोली जमा करण्याची अंतिम तारीख 31 ऑगस्ट आहे. भारतीय ऑलिंपिक संघटना (IOA) पुढील 48 तासांत ही प्रक्रिया पूर्ण करू शकते.
कॅनडाने आर्थिक कारणांमुळे यातून माघार घेतल्यामुळे भारताला यजमानपद मिळण्याची शक्यता वाढली आहे. मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, भारताकडून कॉमनवेल्थ गेम्सच्या यजमानपदासाठी अहमदाबादची (दावेदारी सादर केली जाईल.
अहमदाबाद का निवडले?
गुजरात राज्यातील अहमदाबाद हे जागतिक दर्जाचे स्टेडियम आणि अत्याधुनिक प्रशिक्षण सुविधांसह एक आदर्श यजमान शहर आहे. जगातील सर्वात मोठे नरेंद्र मोदी स्टेडियम येथे आयसीसी क्रिकेट विश्वचषक 2023 चा अंतिम सामना खेळला गेला होता. 2030 च्या कॉमनवेल्थ गेम्समध्ये 72 देशांतील मोठ्या संख्येने खेळाडू सहभागी होतील.
या मोठ्या क्रीडा आयोजनामुळे भारताला अनेक फायदे मिळतील. पर्यटनाला चालना, रोजगार निर्मिती तसेच, लाखो तरुण खेळाडूंना खेळाला करिअर म्हणून निवडण्याची प्रेरणा मिळेल.
यापूर्वी भारताने 2010 मध्ये नवी दिल्लीत कॉमनवेल्थ गेम्सचे यशस्वीपणे आयोजन केले होते, ज्यात भारताने आपली सर्वोत्तम कामगिरी नोंदवली होती. 2026 मध्ये स्कॉटलंडमधील ग्लासगो येथे, तर 2022 मध्ये बर्मिंगहॅम, इंग्लंडमध्ये हे गेम्स आयोजित करण्यात आले होते.
2030 च्या कॉमनवेल्थ गेम्सच्या यजमान देशाचा निर्णय नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यात ग्लासगो येथे होणाऱ्या सभेत घेतला जाईल.
ताज्या बातम्यांसाठी येथे क्लिक करून नवाकाळचे WhatsApp Channel फॉलो करा
हे देखील वाचा –
Ganeshotsav 2025 : रील बनवा आणि 1 लाखांपर्यंतचे रोख बक्षीस जिंका; महाराष्ट्र सरकारची अनोखी स्पर्धा
1 सप्टेंबरपासून लागू होणार 5 मोठे बदल; तुमच्या बजेटवर थेट परिणाम होण्याची शक्यता