IPL 2025 : गुजरात टायटन्स आणि पंजाब किंग्समध्ये रंगणार आजचा सामना, संभाव्य प्लेइंग 11 कशी असू शकते?

IPL 2025 GT vs PBKS | इंडियन प्रीमियर लीगच्या (IPL 2025) 18व्या सीझनमधील आज पाचवा सामना खेळवला जाणार आहे. IPL 2025 मधील 5वा सामना गुजरात टायटन्स आणि पंजाब किंग्स (Gujarat Titans vs Punjab Kings) या संघांमध्ये  होणार आहे.

गुजरात आणि पंजाबमधील हा सामना अहमदाबाद येथे खेळला जाणार आहे. मागील सीझनमधील तुलनेत दोन्ही संघांमध्ये मोठे बदल झाले आहेत. यावर्षी देखील गुजरात टायटन्सच्या कर्णधारपदाची जबाबदारी पुन्हा एकदा शुभमन गिल (Shubman Gill) सांभाळणार आहे. तर, पंजाब किंग्सचा कर्णधार या हंगामात श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) आहे. श्रेयसने गेल्या हंगामात त्याच्या नेतृत्वाखाली केकेआरला विजेतेपद मिळवून दिले होते.

दोन्ही संघात मोठे बदल झाले आहेत. गुजरात टायटन्सने IPL 2025 च्या लिलावात 68.85 कोटी रुपये खर्चून अनेक नवीन खेळाडूंना संघात समाविष्ट केले आहे. तर पंजाबबद्दल सांगायचे तर आतापर्यंतची कागदावरील सर्वोत्तम टीम पाहायला मिळत आहे. पंजाबने 110.15 कोटी रुपये खर्च चांगला संघ उभारला आहे. 

या दोन्ही संघांमध्ये IPL इतिहासात आतापर्यंत फक्त 5 सामने खेळले गेले आहेत. या पाच T20 सामन्यांपैकी 3 वेळा गुजरात टायटन्सने विजय मिळवला आहे, तर 2 सामने पंजाब किंग्सने जिंकले आहेत.

आजचा (25 मार्च) अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळला जाईल. हा सामना सायंकाळी 7:30 वाजता सुरू होईल. तर त्याआधी 7 वाजता टॉस होईल. गुजरात टायटन्स आणि पंजाब किंग्स (Gujarat Titans vs Punjab Kings) संघामधील हा सामना तुम्ही स्टार स्पोर्ट्स नेटवर्क आणि JioHotstar वर पाहू शकता.

पंजाब किंग्स संभाव्य प्लेइंग 11: श्रेयस अय्यर (कर्णधार), प्रभसिमरन सिंग, जोश इंग्लिस (यष्टीरक्षक), मार्कस स्टोइनिस, ग्लेन मॅक्सवेल, शशांक सिंग, नेहल वधेरा, मार्को जानसेन, हरप्रीत ब्रार, अर्शदीप सिंग, युजवेंद्र चहल.

गुजरात टायटन्स संभाव्य प्लेइंग 11: शुबमन गिल (कर्णधार), जोस बटलर (यष्टीरक्षक), साई सुदर्शन, ग्लेन फिलिप्स, राहुल तेवतिया, वॉशिंग्टन सुंदर, रशीद खान, मोहम्मद सिराज, साई किशोर, कागिसो रबाडा, प्रसिद्ध कृष्णा.