IPL 2025 Prize Money | आयपीएलच्या (IPL 2025) अंतिम सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळूरु (Royal Challengers Bengaluru ) ने पंजाब किंग्सला (Punjab Kings – PBKS) पराभूत करत पहिल्यांदाच विजेतेपद मिळवले. नरेंद्र मोदी स्टेडियमवर झालेल्या रोमहर्षक सामन्यात आरसीबीने 191 धावांचे आव्हान दिले, तर पंजाब किंग्सला 184 धावांवर रोखत 6 धावांनी विजय मिळवला. या महत्त्वपूर्ण विजयानंतर विराट कोहलीने (Virat Kohli) भावूक झाल्याचे पाहायला मिळाले.
सामन्यात कृणाल पांड्याच्या (Krunal Pandya) भेदक गोलंदाजीने महत्त्वाची भूमिका बजावली. तसेच भुवनेश्वर कुमार, जोश हेजलवुड आणि यश दयाल यांच्या यशस्वी कामगिरीमुळे आरसीबीने आपल्या ऐतिहासिक विजयावर शिक्कामोर्तब केले.
दुसरीकडे, पंजाब किंग्सची विजेतेपदाची प्रतीक्षा अजूनही कायम आहे. 11 वर्षांनंतर ते पहिल्यांदाच अंतिम फेरीत पोहोचले. शशांकने 30 चेंडूत नाबाद 61 धावा करत शानदार फलंदाजी केली, परंतु त्याचा संघ विजेतेपद मिळवू शकला नाही.
या स्पर्धेत विजेत्या, उपविजेत्यासंघासह तिसऱ्या व चौथ्या क्रमांकावरील संघाला देखील मोठी बक्षीसाची रक्कम मिळाली. बक्षीस स्वरुपात बीसीसीआयकडून कोट्यावधी रुपयांची रक्कम देण्यात आली. विजेत्या आरसीबीला 20 कोटी रुपयांची बक्षीस रक्कम मिळाली आहे. तर उपविजेत्या पंजाब किंग्सला 12.5 कोटी रुपये मिळाले.
आयपीएल 2025 फायनलमधील बक्षीस रक्कम
- विजेता (आरसीबी): 20 कोटी रुपये
- उपविजेता (पंजाब किंग्स): 12.5 कोटी रुपये
- तिसरे स्थान (मुंबई इंडियन्स): 7 कोटी रुपये
- चौथे स्थान (गुजरात टायटन्स): 6.5 कोटी रुपये
वैयक्तिक पुरस्कार आणि बक्षीस रक्कम
- ऑरेंज कॅप : साई सुदर्शन (गुजरात टायटन्स) – 10 लाख रुपये
- पर्पल कॅप : प्रसिद्ध कृष्णा(गुजरात टायटन्स) – 10 लाख रुपये
- सर्वात मूल्यवान खेळाडू : 10 लाख रुपये
- सर्वोत्तम झेल : 10 लाख रुपये
- हंगामातील उदयोन्मुख खेळाडू : 10 लाख रुपये
- हंगामातील सुपर स्ट्रायकर : 10 लाख रुपये
- हंगामातील फँटसी खेळाडू : 10 लाख रुपये