IPL 2025 : आज मुंबई इंडियन्स विरुद्ध बंगळूरु यांच्यात महामुकाबला; कोण मारणार बाजी?

IPL 2025, RCB vs MI | इंडियन प्रीमियर लीग 2025 (IPL 2025) च्या 20व्या सामन्यात आज (7 एप्रिल) वानखेडे स्टेडियमवर पाच वेळची विजेती मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) आणि चांगल्या फॉर्ममध्ये असलेली रॉयल चॅलेंजर्स बंगळूरु (Royal Challengers Bengaluru) आमनेसामने येणार आहेत.

मुंबई इंडियन्ससाठी ‘करो या मरो’ची स्थिती!

हार्दिक पांड्याच्या (Hardik Pandya) नेतृत्वाखालील मुंबई इंडियन्ससाठी हा सामना अत्यंत महत्त्वाचा आहे. आतापर्यंत संघाने 4 सामने खेळले असून केवळ 1 सामन्यातच विजय मिळवलेला आहे. पहिल्या दोन सामन्यांमध्ये त्यांना चेन्नई सुपर किंग्ज (Chennai Super Kings) आणि गुजरात टायटन्स (Gujarat Titans) कडून पराभव स्वीकारावा लागला होता. तिसऱ्या सामन्यात त्यांनी बंगळूरुलाच 8 विकेट्सने पराभूत करत पुनरागमन केले, मात्र मागील सामन्यात लखनऊ सुपर जायंट्स (Lucknow Super Giants) कडून पुन्हा एकदा हार पत्करावी लागली.

रजत पाटीदार (Rajat Patidar) यांच्या नेतृत्वाखालील आरसीबी (RCB) चा फॉर्म तुलनेत अधिक चांगला आहे. त्यांनी आतापर्यंत 3 सामन्यांमध्ये 2 विजय मिळवले आहेत. पहिल्या सामन्यात त्यांनी राजस्थान रॉयल्सला 7 विकेट्सने हरवले, दुसऱ्या सामन्यात चेन्नईवर त्यांच्या घरच्या मैदानावर 50 धावांनी विजय मिळवला. मात्र, मागील सामन्यात त्यांना गुजरातकडून पराभवाचा सामना करावा लागला.

मुंबई vs बंगळूरु: इतिहास काय सांगतो?

आयपीएलच्या इतिहासात दोन्ही संघांमध्ये एकूण 33 सामने झाले आहेत. त्यापैकी मुंबईने 19 वेळा विजय मिळवला आहे, तर बंगळूरुने 14 सामने जिंकले आहेत. आकडेवारी मुंबईच्या बाजूने असली तरी यंदाच्या फॉर्मनुसार दोन्ही संघांत काट्याची टक्कर होण्याची शक्यता आहे.

MI vs RCB – संघ

मुंबई इंडियन्स संघ (Mumbai Indians):

विल जॅक, रायन रिकेलटन (विकेटकीपर), नमन धीर, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, हार्दिक पांड्या (कर्णधार), मिचेल सेंटनर, राज बावा, दीपक चाहर, अश्विनी कुमार, विग्नेश पुथुर, जसप्रीत बुमराह, कॉर्बिन बॉश, रॉबिन मिंज, सत्यनारायण राजू, कर्ण शर्मा, रोहित शर्मा, ट्रेंट बोल्ट, रीस टॉपले, मुजीब उर रहमान, कृष्णन श्रीजीत, अर्जुन तेंडुलकर, बेवन जेकब्स.

रॉयल चॅलेंजर्स बंगळूरु संघ (RCB):

फिलिप साल्ट, विराट कोहली, देवदत्त पडिक्कल, रजत पाटीदार (कर्णधार), लियाम लिविंगस्टोन, जितेश शर्मा (विकेटकीपर), क्रुणाल पंड्या, टिम डेविड, भुवनेश्वर कुमार, जोश हेजलवुड, यश दयाल, रसिख दार सलाम, सुयश शर्मा, मनोज भांडागे, जॅकब बेथेल, स्वप्निल सिंह, अभिनंदन सिंह, रोमारियो शेफर्ड, लुंगी एनगिडी, नुवान तुषारा, मोहित राठी, स्वास्तिक चिकारा.